काय सांगता! स्टेट बॅंकेत दोन हजारांच्या 19 बनावट नोटांचा झाला भरणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता! स्टेट बॅंकेत दोन हजारांच्या 19 बनावट नोटांचा झाला भरणा

गेल्या 29 तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून, यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक पी. एम. मोरे तपास करत आहेत

काय सांगता! स्टेट बॅंकेत दोन हजारांच्या 19 बनावट नोटांचा झाला भरणा

कोरेगाव (जि. सातारा) : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये अज्ञाताने दोन हजारांच्या 19 बनावट नोटांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामागे रॅकेट कार्यरत आहेत काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोरेगाव शाखेचे मुख्य प्रबंधक राकेशकुमार अवदेषकुमार चौरसिया (रा. विसावा नाका, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात म्हटले आहे, की स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोरेगाव येथील कॅश डिपॉझिट मशीनमध्ये कोणीतरी अज्ञाताने दोन हजारांच्या 19 बनावट नोटांचा भरणा केला आहे. या सर्व नोटांवर BAD 313390 असा सिरियल क्रमांक आहे. या नोटा बनावट असल्याचे माहीत असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या खऱ्या नोटा आहेत, म्हणून अज्ञात संशयिताने हे कृत्य केले आहे. 

गेल्या 29 तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून, यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक पी. एम. मोरे तपास करत आहेत. दरम्यान, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये अज्ञाताने दोन हजारांच्या 19 बनावट नोटांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून, या प्रकारामागे रॅकेट कार्यरत आहे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अकलूजच्या मोहिते-पाटलांचा नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न
 
सातारा जिल्ह्यात साेमवारपासून 440 ठिकाणी लसीकरण

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top