शेतकऱ्यांसमोर यंदा अतिरिक्त उसाचे संकट

माजलगाव कार्यक्षेत्रात ३० हजार हेक्टरची नोंद ; उभ्या उसाची टांगती तलवार
sugarcane
sugarcanesakal

माजलगाव : दोन-तीन वर्षांपासून पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. यावर्षीच्या गाळप हंगामात माजलगाव कार्यक्षेत्रातील तिन्ही कारखान्यांकडे तब्बल ३० हजार हेक्टरची विक्रमी नोंद झालेली आहे. यामुळे यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊन ऊस उभाच राहण्याच्या भितीची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या डोक्यावर लटकत आहे.

सततच्या दुष्काळाचे चटके सहन केलेले माजलगाव कार्यक्षेत्रातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून ऊस लागवडीकडे वळले आहेत. दोन-तीन वर्षांपासून झालेला समाधानकारक पाऊस, शंभर टक्के भरलेले जायकवाडी, माजलगाव धरण, गोदावरीचे उच्चपातळी बंधारे, भर उन्हाळ्यात वाहणाऱ्या कालव्यामुळे विहीर, विंझण विहिरींची भूजलपातळी वाढली आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. दोन वर्षांपासून माजलगाव धरण, पैठणचे जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केलेली आहे. यामुळे यंदाच्या गाळप हंगामात परिसरातील तिन्ही कारखान्यांकडे जवळपास ३० हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे.

माजलगाव कार्यक्षेत्रातील तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके, पवारवाडी येथील जय महेश तर, सावरगाव येथील छत्रपती हे तीन कारखाने सुरु आहेत. या तिन्ही कारखान्यांची दर दिवसाची गाळप क्षमता अनुक्रमे ५ हजार, ७ हजार, दीड हजार असे एकूण १३ हजार ५०० मेट्रिक टन आहे. तिन्ही कारखाने दरदिवशी अंदाजे १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करतात. यंदाचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सात महिने चालला तरी ३० हजार मेट्रिक टनाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल का नाही? याबाबत शासंकता आहे. शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी शंभर ते १२५ टन उसाचे उत्पादन निघाले आहे. हेच उत्पादन पुढील वर्षी ग्राह्य धरले तर कार्यक्षेत्रात एकूण अंदाजे २८ लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उसाचे उत्पादन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर पुढील वर्षी अतिरिक्त उसाचे संकट उभा राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेटकेन बंदी आवश्यक

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला तिन्ही कारखान्यांनी बाहेरच्या कार्यक्षेत्रातून गेटकेनचा ऊस मोठ्या प्रमाणात आणला आहे. पुढील वर्षी कार्यक्षेत्रातच क्षमतेपेक्षा जास्त नोंद झाली आहे. यामुळे कारखान्यांनी गेटकेनच्या उसाला बंदी न घातल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न निश्चित निर्माण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com