चित्रपट निर्माते मच्छिंद्र मोरेंचे निधन

चित्रपट निर्माते मच्छिंद्र मोरेंचे निधन

वडूज (जि. सातारा) : हिंगणे (ता. खटाव) येथील चित्रपट निर्माते, लेखक, गीतकार, नाटककार, साहित्यिक मच्छिंद्र गणपत मोरे (वय 64) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई (वडाळा) येथील बीपीटी रुग्णालयात उपचार सुरू होते.
 
हिंगणेसारख्या ग्रामीण भागातील त्यांनी मुंबई येथे नाट्य, चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमविले. एक ग्रामीण लेखक, निर्माता, गीतकार म्हणून त्यांची ओळख झाली होती. त्यांचे "हिरकणी', "मुक्काम पोस्ट लंडन', "माझा नवरा तुझी बायको', "बकुळा नामदेव घोटाळे', "इरसाल गावची इरसाल माणसं', "मुक्ती', "बाजीराव', "वासुदेव बळवंत फडके' आदी त्यांचे चित्रपट तसेच नाटक व साहित्यकृती गाजल्या. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com