दूषित पाण्यामुळे शेंडेवाडीच्या तलावातील मासे मृत्युमुखी?; आरोग्य यंत्रणा सतर्क

शेंडेवाडी गावाजवळच्या तलावातील मासे अचानक मृत्युमुखी पडू लागल्याने ग्रामस्थ काळजीत आहेत.
Fish
Fishesakal

ढेबेवाडी (सातारा) : शेंडेवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) गावाजवळच्या तलावातील (Shendewadi Lake) मासे (Fish) अचानक मृत्युमुखी पडू लागल्याने ग्रामस्थ काळजीत आहेत. या तलावाजवळच तीन गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर असून त्यात तलावातील दूषित पाणी पाझरण्याची भिती असल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तलावातील पाण्याचे नमुने तातडीने रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (Fish Die In Shendewadi Lake Satara Marathi News)

शेंडेवाडी पासून एक किलोमीटरवर डोंगराजवळ जुना पाझर तलाव असून त्यात नेहमी मुबलक पाणीसाठा असतो. गेल्या दोन दिवसांपासून त्यातील मासे अचानक मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगत असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. याबाबत समजताच ग्रामविकास अधिकारी प्रसाद यादव तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,आरोग्य कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. एक ते दीड किलोपर्यंत वजनाचे लहान-मोठे मृत मासे काठावर तरंगत असल्याचे आढळून आले.

Fish
कर्नाटकावर अस्मानी संकट; दोन दिवसात राज्याला Tauktae चक्रीवादळाचा तडाखा?

तलावापासून जवळच चिखलेवाडी, गलमेवाडी, वरेकरवाडी या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेची विहीर आहे. तलावातील पाणी झिरपून विहिरीत मिसळण्याची भीती असल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. मासे नेमके कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडत आहेत. तलावातील पाण्यात कोणता विषारी घटक तर मिसळलेला नाही ना? याची तातडीने तपासणी होणे गरजेचे असल्याने उद्या (शनिवारी) तेथील पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच माशांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांबाबत बोलता येईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोंजारी यांनी सांगितले.

Fish Die In Shendewadi Lake Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com