
सातारा : उड्डाणपुलांच्या सुशोभीकरणासाठी साडेसात कोटी
सातारा : सातारा शहराचे प्रवेशव्दार असणाऱ्या वाढे फाटा, बाँबे रेस्टॉरंट, अजंठा चौक येथील उड्डाणपुलांच्या खालील भाग विकसित करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. त्यासाठी सुमारे सात कोटी ५० लाखांच्या निधीची आवश्यकता असून तो हद्दवाढ विकास निधी किंवा ‘नगरोत्था’मधून उपलब्ध होणार आहे. हा निधी काही दिवसांत मिळणार असल्याने त्यासाठीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
सातारा शहरात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना महामार्गावर असणारा वाढे फाटा, बाँबे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करावा लागतो. या उड्डाणपुलांच्या खाली मोकळी जागा असून त्याचा वापर इतर कारणास्तव होतो. या ठिकाणी टपऱ्यांचे अतिक्रमणदेखील झाले असून अनेक ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे तो भाग बकाल झाला आहे. हद्दवाढीमुळे हा भाग पालिकेत आल्याने या भागाची काही महिन्यांपूर्वी पाहणी करत खासदार उदयनराजे भोसले
बाँबे रेस्टॉरंट चौकात थीमपार्क
बाँबे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाची लांबी सर्वाधिक असून त्याखाली असणाऱ्या जागेचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याठिकाणी वाहनतळ, भिंतींवर विविध प्रकारची चित्रे, थीमपार्क तसेच इतर नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार काम झाल्यास हा भाग साताऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे. त्याचबरोबर वाढे फाटा येथील उड्डाणपुलाखाली भिंतींवरदेखील विविध चित्रे रेखाटण्यात येणार असून त्यातून सातारा शहराची महती, महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
उड्डाणपुलाखालील जागांचा सुशोभीकरणासाठी वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असणारा निधी लवकरच उपलब्ध होईल. त्यानंतर त्याठिकाणच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या कामांमुळे सातारा शहराचे प्रवेशव्दार असणाऱ्या या उड्डाणपुलांचा चेहरा बदलून जाईल.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका
Web Title: Flyovers Funding Beautification Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..