सातारा : प्राण्यांसाठी ५५ हजार लिटर पाणी पाणवठ्यांद्वारे सोय; वन विभागाचा पुढाकार

सातारा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून याठिकाणी अनेक प्रकारच्‍या वन्‍यप्राणी आणि पक्ष्‍यांचा अधिवास
Forest Department initiative  55000 liters of water for animals through reservoirs satara
Forest Department initiative 55000 liters of water for animals through reservoirs satarasakal

सातारा : नागरी वस्‍तीत पाण्‍याच्‍या शोधार्थ शिरणाऱ्या वन्‍यप्राणांचा मानवांशी होणारा संघर्ष टाळण्‍यासाठी सातारा वनपरिक्षेत्रात ११२ पाणवठे तयार करण्‍यात आले आहेत. या पाणवठ्यांमध्‍ये आजअखेर ५५ हजार लिटर पाणी वन विभागाच्‍या वतीने भरण्‍यात आले असून या पाण्‍यामुळे वन्‍यप्राण्‍यांची पाण्‍यासाठीची भटकंती थांबल्‍याचे दिसू्न येते. सातारा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून याठिकाणी अनेक प्रकारच्‍या वन्‍यप्राणी आणि पक्ष्‍यांचा अधिवास आहे. उन्‍हाळ्याची तीव्रता वाढल्‍यानंतर जंगलाच्‍या अंतर्गत भागात असणारे पाणवठे आटू लागतात. ते पाणवठे आटल्‍यानंतर जंगली प्राण्‍यांना पाण्‍याच्‍या शोधासाठी भटकंती करावी लागते.

पाण्‍याच्‍या शोध घेत फिरताना अनेकदा नकळतपणे वन्यप्राणी नागरी वस्‍तीत शिरत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरी वस्‍तीत शिरलेल्‍या वन्‍यप्राण्‍याला हुसकावून लावण्‍याचे प्रयत्‍न होतात. यातून निर्माण होणाऱ्या वन्‍यप्राणी- मानव यांच्यातील संघर्ष काही वेळेला टोकाला जातो. तो टाळण्‍यासाठी वन विभागाच्‍या वतीने दरवर्षी तीव्र उन्‍हाळ्याच्‍या काळात वनक्षेत्रात तसेच लगतच्‍या भागात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. यंदाही सातारा वनक्षेत्रात वनकर्मचारी, वनमित्र व स्‍थानिकांच्‍या मदतीने ११२ पाणवठे तयार करण्‍यात आले आहेत. या प्रत्‍येक पाणवठ्याची पाणीसाठवण क्षमता ८० लिटर आहे. दर पाच दिवसांनी हे पाणवठे पाण्‍याने काठोकाठ भरण्‍यात येतात. गेले महिनाभर उन्‍हाची तीव्रता जास्‍त असल्‍याने कृत्रिम पाणवठे आटणार नाहीत, याची जास्‍तीची दक्षता वन विभागाच्‍या वतीने घेण्‍यात येत आहे.

पाणवठ्यांमध्‍ये पाणी भरण्‍यासाठी टँकर, छोटी चारचाकी वाहने, दुचाक्‍यांची मदत घेतली जात आहे. ज्‍याठिकाणी टँकर जाणे शक्‍य आहे, तेथे टँकरव्‍दारे, अरुंद जंगलवाटेच्या ‍ठिकाणी छोटी चारचाकी वाहने आणि दुर्गम जंगलवाटेवरील पाणवठ्यात पाणी भरण्‍यासाठी दुचाकीचा वापर केला जातो. दुचाकीवर पाण्‍याचे छोटे कॅन बांधून वन कर्मचारी नेमून दि‍लेले पाणवठे पाण्‍याने पूर्ण भरण्‍यासाठी गेले महिनाभर कष्ट घेत आहेत. आजपर्यंत या ११२ पाणवठ्यांमध्‍ये सुमारे ५५ हजार लिटर पाणी भरले आहे. या पाण्‍यामुळे वन्‍यप्राण्‍यांची पाण्‍यासाठीची भटकंती आणि मानवी आणि वन्‍यप्राणी यांच्‍यातील संघर्ष थांबण्‍यास मदत झाली आहे.

उन्‍हाची तीव्रता वाढल्‍याने सातारा वनक्षेत्रात ११२ पाणवठे तयार केले आहेत. विभागानुसार त्‍या पाणवठ्यांची जबाबदारी कर्मचाऱ्यांकडे देण्‍यात आली. यासाठी काही ठिकाणी स्‍थानिकांची देखील मदत घेतली जात आहे. आजअखेर या पाणवठ्यांवर शेकडो जंगली प्राणी, पक्ष्‍यांनी तहान भागवली आहे. हा उपक्रम संततधार पाऊस सुरू होईंपर्यंत सुरू राहील.

-डॉ. निवृत्ती चव्‍हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com