
फलटण : दुसऱ्याच्या नावाने गाळ्यांची नोंद ; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
फलटण शहर : खोट्या सह्या व अंगठे करून बनावट कागदपत्रे तयार करून संगनमताने दुसऱ्याच्या नावाने गाळ्यांची नोंद केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह सख्खा भाऊ व पुतण्या अशा १५ जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा: SBI चा नियम 1 तारखेपासून बदलणार! ग्राहकांना होणार मोठा फायदा
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की बापूराव रामा लंगुटे (वय ६२, रा. बरड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचा पुतण्या गणेश विठ्ठल लंगुटे, भाऊ विश्वनाथ रामा लंगुटे (दोघेही रा. बरड) यांनी त्यांच्या नावाने मालमत्ता क्रमांकांची (१६२४ व १६२५) नोंद करताना बरड ग्रामपंचायतीने दिलेले शंभर रुपयांचे स्टँप पेपर, गट नंबर ५४ मधील मिळकतधारक व माझे स्वतःच्या नावावर खोट्या सह्या व अंगठे करून, तसेच बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून नोंद करण्यासाठी संमती पत्र, अर्ज व प्रतिज्ञापत्र दिले. ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक दत्तात्रय सोपान भोसले (रा. घाडगेवाडी, ता. फलटण) व १६ जानेवारी २०१८ रोजीच्या बरड ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीस हजर असणाऱ्या सरपंच तृप्ती संतोष गावडे, उपसरपंच गोरख बबन ढेंबरे, सदस्य माधुरी गणेश लंगुटे, प्रीतम विठ्ठल लोंढे, रतन गुणवंत बागाव, गजानन रामदास गावडे, हेमलता हनुमंत गावडे, कमल सुभेदार लोंढे, रुक्मिणी तुकाराम शिंदे, शेखर दिलीप काशीद, वनिता अण्णा लंगुटे, सचिन गजानन हाके (सर्व रा. बरड) या सर्वांनी आपापसात संगनमत करून बरड ग्रामपंचायतीत गणेश विठ्ठल लंगुटे यांचे नावाने मालमत्ता (क्र. १६२४) व विश्वनाथ रामा लंगुटे यांच्या नावाने मालमत्ता (क्र. १६२५) या गाळ्यांची बेकायदेशीरपणे नोंद घेतली. त्यावरून १५ जणांविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करीत आहेत.
Web Title: Forged Documents False Signatures And Thumbprints Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..