बिहारमधील सेंटरमधून 'एटीएम क्‍लोनिंग'द्वारे कोरेगावातील खातेदाराची फसवणूक

राजेंद्र वाघ
Saturday, 7 November 2020

कोरेगाव येथील शाखेचे खातेदार राजेंद्र धोंडीराम जाधव (रा. एकंबे, ता. कोरेगाव) यांच्या बचत खात्यातून याच बॅंकेच्या बिहारमधील पटना सर्कल येथील एटीएम सेंटरमधून अज्ञाताने "एटीएम क्‍लोनिंग, स्किमिंग'द्वारे तयार केलेल्या बनावट (डुप्लिकेट) एटीएमचा वापर करून 46 हजारांची रक्कम काढून फसवणूक केली आहे.

कोरेगाव (जि. सातारा) : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोरेगाव शाखेच्या एकंबे (ता. कोरेगाव) येथील खातेदाराची 46 हजारांची रक्कम याच बॅंकेच्या बिहारमधील पटना सर्कल येथील एटीएममधून "एटीएम क्‍लोनिंग'द्वारे अज्ञाताने परस्पर काढली आहे. 

बॅंकेच्या कोरेगाव शाखेचे व्यवस्थापक राकेशकुमार अवदेशकुमार चौरासिया (रा. सुंदरा गार्डन, विसावा नाका, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की बॅंकेच्या कोरेगाव येथील शाखेचे खातेदार राजेंद्र धोंडीराम जाधव (रा. एकंबे, ता. कोरेगाव) यांच्या बचत खात्यातून याच बॅंकेच्या बिहारमधील पटना सर्कल येथील एटीएम सेंटरमधून अज्ञाताने "एटीएम क्‍लोनिंग, स्किमिंग'द्वारे तयार केलेल्या बनावट (डुप्लिकेट) एटीएमचा वापर करून 46 हजारांची रक्कम काढून फसवणूक केली आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2019 ते 26 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली आहे. परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी रितू खोखर तपास करत आहेत. 

सोने-दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश; शिरवळ पोलिसांची जबरी कामगिरी

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud Of Account Holder In Koregaon Satara News