दीड वर्षात कऱ्हाड तालुक्‍यातील तब्बल 53 सहकारी संस्था दिवाळखोरीत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड वर्षात कऱ्हाड तालुक्‍यातील तब्बल 53 सहकारी संस्था दिवाळखोरीत!

दीड वर्षात कऱ्हाड तालुक्‍यातील तब्बल 53 वेगवगेळ्या सहकार क्षेत्रातील विविध संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. उपनिबंधक कार्यालयाने त्या संस्था दिवाळखोरीत असल्याचे जाहीर केले आहे.

दीड वर्षात कऱ्हाड तालुक्‍यातील तब्बल 53 सहकारी संस्था दिवाळखोरीत!

कऱ्हाड (ता. सातारा) : दीड वर्षात तालुक्‍यातील तब्बल 53 वेगवगेळ्या सहकार क्षेत्रातील विविध संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. उपनिबंधक कार्यालयाने त्या संस्था दिवाळखोरीत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये पतसंस्थांसह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. मतदार याद्या न देणे, सरकारी कागदपत्रांची पूर्तता न करणे अशा क्षुल्लक कारणाने संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्या संस्था अवसायनात असल्याचे जाहीर करण्यात आल्याने त्या संस्थांचे कामकाजच ठप्प आहे. 

तालुक्‍यात 150 अधिक सहकारी संस्था आहेत. त्यातील मार्चपर्यंत 30 संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्यात चार-नागरी पतसंस्था, पाच- बिगर नागरी पतसंस्था, तीन- स्वयंरोजगार संस्था, चार- गृहनिर्माण संस्था, एक- पाणीपुरवठा संस्था, पाच- औद्योगिक संस्था, तीन- यंत्रमाग संस्था आणि अन्य पाच संस्थांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अतिशय क्षुल्लक चुका झाल्याने त्या संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. एप्रिल ते आजअखेर 23 संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्यात दोन ग्रामीण बिगरशेती पतसंस्था तर अन्य 21 नावीन्यपूर्ण संस्थांचा समावेश आहे. तालुक्‍यात भाजपच्या काळात 38 नावीन्यपूर्ण संस्थांची नेमणूक झाली होती. त्यातील 21 संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. अन्य 17 संस्थांचे व्यवहार अद्यापही अपूर्ण आहेत. त्या संस्थांनी तयार केलेल्या प्रकल्पालाही मान्यता नाही. त्यामुळे काही संस्था आर्थिक अडचणीत आहेत. मात्र, शासन त्यांच्याबाबत काय निर्णय घेणार, यावर त्यांचे भवितव्य आहे. त्यामुळे त्या संस्था अजूनही दिवाळखोरीत नाहीत. 

कऱ्हाड जनता बॅंक दिवाळखोरीत; रिझर्व्ह बॅंकेकडून परवाना रद्द

तालुक्‍यातील स्वावलंबनासह किरकोळ व्यवसाय सुरू करण्यासाठी, शेतीपूरक व्यवसायासाठी, शेतीमालाच्या गोदामासाठीही काही संस्था तयार झाल्या आहेत. या संस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. दिवाळखोरी जाहीर झालेल्या संस्था 59 आहेत. त्यामध्ये अनेक संस्थांनी ऑडिट पूर्ण केलेले नाही, काही संस्थांनी मतदार याद्यांकडे दुर्लक्ष केले आहे, काही संस्थांनी सरकारी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, काही संस्थांनी सरकार हवे असलेली माहिती दिलेली नाही, अशा अगदी क्षुल्लक कारणाने त्या संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. 

सातारा जिल्हा पोलिस दलातील 39 अधिकाऱ्यांच्या बदल्या!

...अशा आहेत बंद संस्था (मार्चपर्यंत) 

  • बिगरशेती व नागरी पतसंस्था- 9 
  • स्वयंरोजगार संस्था- 5 
  • गृहनिर्माण संस्था- 4 
  • पाणीपुरवठा संस्था- 1 
  • औद्योगिक संस्था- 5 
  • यंत्रमाग संस्था- 3 
  • इतर संस्था- 5 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Web Title: Future 53 Co Operative Societies Karad Taluka Danger Satara News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara