esakal | जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता
sakal

बोलून बातमी शोधा

जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता

गणेश तेथे जाताच त्यांनी त्या व्यक्तीला थेट ऑक्‍सिजन लावले. तरीही त्यांच्या शरीरातील ऑक्‍सिजन लेव्हल व्यवस्थित होत नव्हती.

जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : मध्यरात्रीचा दीड वाजला होता... शुक्रवार पेठेत एकास धाप लागली होती... रात्री उशिरा धाडसाने एक युवक पोर्टेबल ऑक्‍सिजन किट घेऊन आला. त्याने ते लावूनही संबंधिताच्या शरीरातील ऑक्‍सिजन लेव्हल वाढत नव्हती. अर्धा तास त्यांना रुग्णालयात नेले नाही तर त्यांच्या जिवाला धोका होता. पोर्टेबल ऑक्‍सिजन लावून फारसा उपयोग होत नव्हता. दारात रुग्णवाहिका होती. मात्र, चालक नव्हता. अखेर ऑक्‍सिजन किट घेऊन आलेल्या युवकाने त्यांना रुग्णवाहिकेत बसविले. थेट कोविड सेंटर गाठले. वेळेत दाखल झालेल्या व त्यांना दाखल करण्यासाठी धाडस दाखविणाऱ्या गणेश पवार या युवकाचे कौतुक होत आहे.

मध्यरात्री गणेश पवार यांच्या मित्राने त्यास शुक्रवार पेठेत एकाला धाप लागल्याचे सांगितले. ऑक्‍सिजन किट घेऊन ये, असे स्पष्ट केले. त्यावेळी गणेश यांनी कुंभार गल्लीतील ऑक्‍सिजन किट घेऊन शुक्रवार पेठ गाठली. तो गेला त्यावेळी रुग्णाला धाप लागली होती. नियोजन सभापती विजय वाटेगावकर तेथे होते. तेही त्या व्यक्तीसाठी प्रयत्न करत होते. गणेश तेथे जाताच त्यांनी त्या व्यक्तीला थेट ऑक्‍सिजन लावले. तरीही त्यांच्या शरीरातील ऑक्‍सिजन लेव्हल व्यवस्थित होत नव्हती.

काेराेनाची करुण कहाणी : आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे? 

अखेर त्यांनी वाटेगावकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी 108 क्रमांकाला फोन लावला. मात्र, ती रुग्णवाहिका त्वरित येणार नव्हती. अखेर एका हॉस्पिटलची रुग्णवाहिका उपलब्ध हाेईल अशी खात्री झाली. मात्र, त्याचा चालक घटनासथळी नसल्याची माहिती मिळाल्याने अखेर गणेशने ती रुग्णवाहिका क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयाच्या व्यवस्थानाकडून आणली. गणेश थेट त्या रुग्णवाहिकेचा चालकच बनला. त्याने त्या रुग्णाला रुग्णवाहिकेत बसवले. कशाचीही वाट न पाहता व जिवाची पर्वा न करता गणेशने रुग्णवाहिका चालवत थेट कोविड सेंटरला गाठले. त्यांनी त्या व्यक्तीला दाखल केले आणि नंतर घर गाठले.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

loading image
go to top