National Highway : तोंडावर औषधाच्या स्प्रेचा फवारा मारून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लूट; 12 तासांत टोळीला अटक

रात्री दहाच्या सुमारास साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप व्हॅनमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते.
Pune Bangalore Highway Crime News
Pune Bangalore Highway Crime Newsesakal
Summary

२४ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सुनील फुलारी, समीर शेख, बापू बांगर यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) एका कुरिअर कंपनीच्या (Courier Company) वाहनाला अडवून त्यातील सोन्या-चांदीच्या नव्या दागिन्यांची लूट केल्याप्रकरणी सात सराईत संशयितांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे.

त्यांच्याकडून चोरीचा ऐवज, गुन्ह्यात वापरलेली गाडी व मोबाईल असा सुमारे २४ लाख ७२ हजार ८२० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

सरफराज सलीम नदाफ (वय ३४), मारुती लक्ष्मण मिसळ (वय २१), समीर धोंडिबा मुलाणी (वय २९) व रियाज दस्तगीर मुजावर (वय ३३, सर्व रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सूरज बाजीराव कांबळे (वय २४) व करण सयाजी कांबळे (वय ३४, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) व गौरव सुनील घाटगे (वय २३, रा. मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Pune Bangalore Highway Crime News
Eknath Shinde : आमदार आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं 'ते' पत्र व्हायरल; राजकीय चर्चांना उधाण

संतकुमार परमार व गोलू दिनेश परमार हे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप व्हॅनमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. रविवारी पहाटे काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावरील पुलावर त्यांच्या गाडीला मोटार आडवी मारून चोरट्यांनी वेदनाशामक औषधाच्या स्प्रेचा फवारा मारून त्यांना जबरदस्तीने खाली उतरविले होते. तसेच सोन्या-चांदीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बॉक्स गाडीसह जबरदस्तीने घेऊन गेले. याबाबत संतकुमार यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्‍वर फुलारी यांनी गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर व एलसीबीचे निरीक्षक अरुण देवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे व उपनिरीक्षक विश्‍वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली होती.

Pune Bangalore Highway Crime News
Eknath Shinde : अलमट्टी धरणामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती..; CM शिंदेंनी दिल्या महत्वाच्या सूचना

तांत्रिक विश्‍लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारे काही संशयित पुणे येथे असल्याची माहिती समोर आली. त्याबाबत समीर शेख यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना संशतितांबाबत माहिती दिली. देवकर यांनी पुणे ग्रामीण एलसीबीचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना संशयितांच्या ठिकाण्याबाबत माहिती दिली. त्यानुसार त्यांनी यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदी केली.

त्यामध्ये मोटार व दोन संशयितांना पकडले. पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी दोन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी करून चोरीला गेलेला ऐवज, मोटार व मोबाईल हस्तगत करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चार संशयित निष्पन्न झाले. त्यातील तिघांना अटक करण्यात आली. ज्ञानेश्‍वर फुलारी, अंकित गोयल, समीर शेख, बापू बांगर व उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरुण देवकर, पुणे ग्रामीण एलसीबीचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, कोल्हापूर एलसीबीचे निरीक्षक महादेव वाघमोडे, स्वप्नील लोखंडे, संतोष पवार, रवींद्र भोरे, बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे.

Pune Bangalore Highway Crime News
Prithviraj Chavan : 'पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढलाय, हे आता लोकांच्या लक्षात आलंय'

तसेच पोलिस उपनिरीक्षक विश्‍वास शिंगाडे, अमित पाटील, हवालदार आतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अमोल माने, राकेश खांडके, मोहन नाचण, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, स्वप्नील माने, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, रोहित निकम, स्वप्नील दौंड, संकेत निकम, शिवाजी गरत हे या कारवाईत सहभागी होते. २४ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सुनील फुलारी, समीर शेख, बापू बांगर यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com