राकुसलेवाडीत ट्रॅक्‍टरच्या धडकेत सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

राकुसलेवाडीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अक्षरा मोरे ही मुलगी खेळत असताना रस्त्याने निघालेल्या ट्रॅक्‍टरची तिला धडक बसली.
Tractor Accident
Tractor Accident Tractor Accident

सातारा : राकुसलेवाडी (ता. सातारा) येथे आज दुपारी सहा वर्षांच्या मुलीस ट्रॅक्‍टरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. अक्षरा जगन्नाथ मोरे (वय सात, रा. राकुसलेवाडी) असे तिचे नाव आहे.

याबाबत जिल्हा रुग्णालयातील पोलिस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, राकुसलेवाडीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अक्षरा मोरे ही मुलगी खेळत असताना रस्त्याने निघालेल्या ट्रॅक्‍टरची तिला धडक बसली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी तिला एका खासगी वाहनातून तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com