esakal | कंत्राटी आरोग्य सेविकांना नोकरी द्या; 'बळीराजा'ची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

कंत्राटी आरोग्य सेविकांना नोकरी द्या; 'बळीराजा'ची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील 1200 कंत्राटी आरोग्य सेविकांना कायम करा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला (Sajid Mulla) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

उपमुख्यमंत्री पवार वाई दौऱ्यावर असताना त्यांनी आज निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी पंधरा वर्षे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेची आरोग्य सेवा केली आहे. या आरोग्य सेविकांना आपण कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करतोय, दुसरीकडे महाराष्ट्रातील ५९७ आरोग्य सेविकांना राज्य सरकारने कमी करण्याचा निर्णय घेऊन त्यांचा संसार उद्धवस्त करण्याचे काम केले आहे. सरकारने मुदत वाढ दिली आहे. मात्र आजचं मरण उद्यावर ढकलण्याचाचे काम केले आहे.

हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार लाईव्ह; पाहा व्हिडिओ

उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे ही मागणी केल्यावर त्यांनी आरोग्य सेविकांना कायम करण्याचे काम केंद्र सरकारचे असल्याचे सांगीतले. केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात 1200 महिलांचे संसार उद्धवस्त करून कुटूंबांवर उपासमारीची वेळ आणू नका. आरोग्य सेविकांना राज्य सरकारने तातडीने कायम करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा बारामती येथे उपमुख्यंत्री पवारांच्या बंगल्यासमोर आरोग्य सेविकांना घेऊन पोरा बाळांसहित आमरण उपोषणास बसणार असल्याचाही इशारा जिल्हाध्यक्ष श्री. मुल्ला यांनी दिला आहे.

loading image
go to top