esakal | गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; भाविकांसाठी दाेन दिवस राहणार मंदिर बंद
sakal

बोलून बातमी शोधा

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; भाविकांसाठी दाेन दिवस राहणार मंदिर बंद

या महोत्सवाच्या संदर्भात गेल्या 15 दिवसांपूर्वीच स्थानिक प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी आखणी करण्याची आवश्‍यकता असतानाही संबंधितांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत दै. "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने बैठक घेतली. मात्र, त्याला इतर महत्त्वाच्या विभागांनाही टाळण्यात आल्याने केवळ कागदोपत्री बैठक झाल्याची चर्चा होती. पोलिस विभागाने मात्र तातडीने बैठक घेऊन नियोजन केले.

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; भाविकांसाठी दाेन दिवस राहणार मंदिर बंद

sakal_logo
By
फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यतिथी महोत्सव यंदा साध्या पद्धतीने होणार असला तरी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या असून सात व आठ जानेवारीला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. समाधी मंदिर समिती, पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत याबाबत विविध निर्णय घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाच्या नियोजनाबाबत स्थानिक प्रशासनाने कळवूनही तालुका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
 
गोंदवले बुद्रुकमधील "श्रीं'च्या समाधी मंदिरात आजपासून (ता. 31) आठ जानेवारीदरम्यान पुण्यतिथी महोत्सव होत आहे. यंदा कोरोनामुळे हा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर  मंदिर समितीचे विश्वस्त, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, अंगराज कट्टे, संजय माने, पंकज पाटील, प्रवीण भोसले, प्रकाश इंदलकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महोत्सव काळात मंदिरातील सेवेकरी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नित्य उपासना करण्यात येईल.

याला म्हणायचं विश्वास! तहसीलदार, डीवायएसपीची मुले शिकणार सरकारी शाळेत  

आजपासून सहा जानेवारीपर्यंत सकाळी सात ते सव्वादहा व दुपारी 12 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले राहील. या महोत्सवाची सांगता आठ जानेवारीला पहाटे पाच वाजून 55 मिनिटांनी समाधीवर गुलाल, फुलांच्या उधळणीने होईल. त्यामुळे भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने सात व आठ जानेवारीला दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. महोत्सव काळात रोज पहाटे पावणेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर समितीच्या वेबसाईटवरून दर्शनाचा लाभ घेता येईल, अशी माहिती विश्वस्तांनी दिली. यंदाचा पालखी सोहळा रद्द झाल्याने रोज सकाळी वाहनातून "श्रीं'च्या पादुका श्रीरामाच्या भेटीला नेण्यात येणार आहेत. दरम्यान, महोत्सवानिमित्त दरवर्षी भरणारी यात्रा यंदा होणार नाही. त्यामुळे बाहेरील व्यापाऱ्यांनी येऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे राजकुमार भुजबळ यांनी सांगितले. 

शिक्षकाने राबविलेल्या स्टोरी ऑन फोन उपक्रमास जागतिक पुरस्कार 

पोलिस विभागाने घडवली बैठक

या महोत्सवाच्या संदर्भात गेल्या 15 दिवसांपूर्वीच स्थानिक प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी आखणी करण्याची आवश्‍यकता असतानाही संबंधितांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत दै. "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने बैठक घेतली. मात्र, त्याला इतर महत्त्वाच्या विभागांनाही टाळण्यात आल्याने केवळ कागदोपत्री बैठक झाल्याची चर्चा होती. पोलिस विभागाने मात्र तातडीने बैठक घेऊन नियोजन केले.

पालकांनाे थांबा! मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका, कऱ्हाडला पहा काय झाले

Video : शहरानंतर आता दुष्काळी तालुक्यात गव्याचा गवगवा

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top