कोरोना परवडला. पण... टोमणे नको; प्रवृत्ती खाेडण्यासाठी 'मनोबल' चे समुपदेशन

प्रवीण जाधव | Wednesday, 12 August 2020

"कोविड-19 हेल्पलाइन'कडे नवनवीन नोंदी होत आहेत. तक्रारदाराने दिलेल्या माहितीची पूर्ण गुप्तता पाळली जाते. ज्याची तक्रार आहे, त्याचे नाव, गाव तसेच कोणाविषयी तक्रार आहे, याची माहिती कोणालाही दिली जात नाही. एका तक्रारीत गावामध्ये ध्वनिक्षेपकावरूनच संबंधित कुटुंबाशी गावातील लोकांनी संपर्क ठेवू नये, असे आवाहन केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकाराने आमचे कुटुंबच खचले आहे, असे त्या तक्रारदाराने सांगितले. 

सातारा : कोरोनामुक्त झालेल्यांना गावी गेल्यानंतर हेटाळणीबरोबरच सामाजिक बहिष्कार व भेदभावाच्या वागणुकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन गावी परतणाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला वेगळ्याच लढ्याला सामोरे जावे लागत आहे. त्यातून अनेकांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे वास्तव कोविड-19 हेल्पलाइनच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे कोरोना परवडला. पण... टोमणे नको, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
प्रसिद्ध उर्दू शायर राहत इंदौरी यांचे निधन 

जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजारांच्यावर गेली आहे. दररोज हा आकडा दोनशेच्या पटीत वाढू लागला आहे. बाधितांवर जिल्ह्यातील 20 हून अधिक कोरोना केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. एका कुटुंबात एक तर काही कुटुंबांत पाच ते दहा जण तसेच आजूबाजूचे शेजारी बाधित झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधित सापडल्यानंतर त्याच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन व्हावे लागते. तसेच बाधिताला किमान दहा दिवस कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयात घालवावे लागतात. कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन हे आपल्या घरी जातात. प्रशासनाकडून घरी जाताना त्यांना फुलांचे गुच्छ देऊन व टाळ्या वाजवून निरोप देण्यात येतो. कोरोनाबाधिताला भेदभावाची वागणूक देऊ नका, असेही वारंवार सांगितले जाते. परंतु, जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वेगळीच परिस्थिती समोर येत आहे.

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा तिच्या विषयी
 
वास्तविक कोरोनामुक्त झालेल्यांना कुटुंब व गावाने मानसिक आधार देणे आवश्‍यक आहे. परंतु, ते घरी जातात त्यावेळी त्यांच्याबरोबरच त्यांच्या घरातील लोकांना भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाची बाधा जणू काय कलंकच, अशी वागणूक त्यांना मिळत आहे. काही ठिकाणी आता तुमचे गावात काय काम आहे. तुम्हाला गावातून हाकलावे लागेल, तुमच्यामुळे गावातील इतरांना बाधा होईल, अशी भीती घातली जात आहे. तर काही ठिकाणी आता गावात आला आहे तर नीट राहा, घरातून बाहेरच पडायचे नाही, पडला तर याद राखा, असे धमकावले जात आहे. त्यामुळे या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
 
अभियांत्रिकी पदविकासाठी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु

अशा मानसिक त्रासातून त्यांना सावरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनोबलच्या माध्यमातून "कोविड-19 हेल्पलाइन' सुरू झाली आहे. येथून घरी गेलेल्या प्रत्येक कोरोनामुक्त व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून समुपदेशन केले जात आहे. त्यावेळी अनेक गोष्टी समोर येत आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर एक पोलिस कुटुंब घरी राहायला आल्यानंतर त्याला त्रास झाला. याबाबतची तक्रार त्याने थेट राज्य सरकारकडे केल्याचेही समोर आले. असाच एक प्रकार जिल्ह्यामध्ये अन्य एका गावात घडला. पती केंद्र सरकार तर पत्नी राज्य सरकारच्या सेवेत आहेत. दोघांनाही कोरोना झाला होता. कोरोना आजारापेक्षा मुक्तीनंतर झालेल्या त्रासामुळे पत्नी खचून गेली होती. तिची मानसिक अवस्था इतकी बिघडली की आता जगायचे नाही, असा विचार तिच्या मनात येत होता. मात्र, पतीने "मनोबल'कडे धाव घेतली. त्यांनी महत्प्रयासाने पत्नीला कलंक आणि भेदभाव या दोन्ही गोष्टींतून बाजूला केले गेले. आता दोघेही आनंदी आहेत. असे अनेक किस्से आहेत. त्याची नोंद "कोविड-19 हेल्पलाइन'कडे केली जात आहे. 

ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेलं एक रम्य ठिकाण शिखर शिंगणापूर!

लाउडस्पीकरवरूनच घोषणा! 

"कोविड-19 हेल्पलाइन'कडे नवनवीन नोंदी होत आहेत. तक्रारदाराने दिलेल्या माहितीची पूर्ण गुप्तता पाळली जाते. ज्याची तक्रार आहे, त्याचे नाव, गाव तसेच कोणाविषयी तक्रार आहे, याची माहिती कोणालाही दिली जात नाही. एका तक्रारीत गावामध्ये ध्वनिक्षेपकावरूनच संबंधित कुटुंबाशी गावातील लोकांनी संपर्क ठेवू नये, असे आवाहन केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकाराने आमचे कुटुंबच खचले आहे, असे त्या तक्रारदाराने सांगितले. 

...म्हणून मुख्याधिकारीपदी अभिजित बापट पुन्हा साताऱ्याला मिळाले 
 

""कोरोनामुक्त झालेल्या लोकांना नवीनच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. "मनोबल'कडे येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत, त्या गंभीर आहेत. काही गावांत कोरोनामुक्त झालेले आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला जातो आहे. याचा त्या लोकांवर आणि खासकरून त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. आम्ही लोकांचे समुपदेशन करत आहोत.'' 

डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, सातारा.

व्हिडिआे पाहण्यासाठी क्लिक करा

Edited By : Siddharth Latkar