Gram Panchayat Election कोणाची जिरणार, कोण तरणार; माण तालुक्यात उत्सुकता

Gram Panchayat Election कोणाची जिरणार, कोण तरणार; माण तालुक्यात उत्सुकता

सातारा : माण तालुक्यात झालेल्या ४७ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) मतदानाची मतमोजणी सोमवारी दहिवडी येथील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजता होणार आहे. या तालुक्यात सर्वांनाच आता निकालाची उत्सुकता लागलेली आहे. मतांची वाढलेली टक्केवारी कोणाची जिरवणार व कोणाला तारणार याची चर्चा गावा गावांत रंगू लागली आहे.

माण तालुक्यात ६१ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. इतर ४७ ग्रामपंचायतींसाठी ५२९ उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यापैकी १९३ जण बिनविरोध निवडून आले आहेत. झाशी येथील एक जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे ३३६ जागांसाठी ७२४ उमेदवार निवडणुकीस सामाेरे गेले आहेत. दरम्यान ४७ गावांसाठी १४७ मतदान केंद्रे होती. यासाठी ७३५ कर्मचारी १०० राखीव कर्मचारी सात झोनल ऑफिसर यांनी निवडणूक प्रक्रिया पुर्ण केली आहे. या तालुक्यात ७५ हजार ५६२ पैकी ६० हजार २२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर टपाली मतदानही यावेळी झाले. यामध्ये २१२ जणांनी आपला हक्क बजावला.

लोणंदला चिकन विक्री, कोंबड्यांचा आठवडा बाजार बंद

पहिल्या फेरीमध्ये हिंगणी, पिंगळी खुर्द, शिरवली, पानवण, मोगराळे. दुसऱ्या फेरीमध्ये पिंगळी बुद्रुक, कारखेल, राणंद, सोकासन. तिसऱ्या फेरीमध्ये पळसावडे, देवापूर, रांजणी, बोडके, गटेवाडी, गोंदवले खुर्द. चौथ्या फेरीत वरकुटे-म्हसवड, शिंदी बुद्रुक, ढाकणी, हस्तनपूर, राजवडी. पाचव्या फेरीमध्ये काळचौंडी, शेनवडी, धामणी, वडजल, वळई. सहाव्या फेरीत किरकसाल, वाघमोडेवाडी, वारुगड, श्रीपालवण, भांडवली. सातव्या फेरीत पर्यंती, शंभुखेड, कुळकजाई, शिंदी खुर्द, येळेवाडी, पिंपरी. आठव्या फेरीत बोथे, कुकडवाड, वडगाव. नवव्या फेरीत गोंदवले बुद्रुक, जांभुळणी. दहाव्या फेरीत शिंगणापूर, शेवरी, डंगीरेवाडी, खडकी तर अकराव्या फेरीत भालवडी, दिवडी अशी मतमोजणी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत संपूर्ण निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com