केलं का मतदान? चला ना लवकर! कार्यकर्त्यांची उसळलीय गावागावांत लगीनघाई

केलं का मतदान? चला ना लवकर! कार्यकर्त्यांची उसळलीय गावागावांत लगीनघाई

सातारा : लाेकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेपेक्षाही ग्रामपंचायतीला मतदान (Gram Panchayat Election) हे चूरशीचे हाेते. सकाळी आठ वाजल्यापासून ते गावागाेवी दिसून आले. सातारा जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळपासून ग्रामपंचायतींसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात 13.11 टक्के मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यात मतदानासाठी उत्साह आहे. तांबवे परिसरात शांततेने मतदान सुरु आहे. येथे ज्येष्ठ नागरिकांचा मतदानासाठी उत्साह आहे. पसरणी (ता.वाई) येथे उत्साहात मतदान सुरू आहे. सकाळ पासून मतदारांची रांग लागली आहे. यावेळी ९० वर्षाच्या आजीनेही मतदानाचा हक्क बजावला. फलटण शहर येथे कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, युवा नेते सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. भांडवली (ता. माण) येथे चुरशीने पण शांततेत मतदान सुरु आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तसेच आरोग्य कर्मचारी तापमान पाहण्यासाठी उपस्थित आहेत. काेंडवे गावात देखील मतदान प्रक्रिया सुरु असून मतदारांचा उत्साह आहे. 

पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पद्मविभूषणपासून उपेक्षितच!

दरम्यान कऱ्हाड तालुक्‍यातील 87 ग्रामपंचायतींसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. त्यासाठी तालुक्‍यातील संबंधित गावात 450 कर्मचारी व अधिकारी यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तालुक्‍यातील यापूर्वीच्या निवडणुकीत गुन्हे दाखल आहेत. अशा सुर्ली, कोपर्डे हवेली, तांबवे, विंग, कालवडे, बेलवडे, काले, कार्वे, शेणोली या पोलिस दप्तरी नोंद असलेल्या कठीण गावांत जादा पोलिस कुमक तैनात करण्यात आली आहे.
 
तालुक्‍यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. त्यामधील अर्ज माघारीच्या दिवशी 12 पूर्णतः बिनविरोध तर पाच अंशतः बिनविरोध ग्रामपंचायती झाल्या. त्यामुळे 87 ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान होत आहे. आजच्या मतदानासाठी पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, 13 पोलिस उपनिरीक्षक, 260 पोलिस कर्मचारी, 167 होमगार्ड आणि एसआरपीएफच्या दोन फलटण मतदानासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावोगावी मोठ्या प्रमाणात कुमक तैनात आहे. 

धक्के देणाऱ्या उदयनराजेंना ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाचा बसणार धक्का?

त्याचबरोबर मागील निवडणुकांत ज्या गावात गुन्हे दाखल झाले आहेत, अशा तालुक्‍यातील सुर्ली, कोपर्डे हवेली, तांबवे, विंग, कालवडे, बेलवडे, काले, कार्वे, शेणोली या पोलिस दप्तरी नोंद असलेल्या कठीण गावांत जादा पोलिस कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यांच्यावर स्वतंत्र पथकामार्फत वॉच ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिसांनी फिरती पथकेही तयार केली आहेत. त्याद्वारेही संबंधित गावांवर नजर ठेवली जात आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यातील कोणत्याही गावात अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता पोलिस प्रशासनाने घेतली आहे. तालुक्‍यातील नऊ कठीण गावात आवश्‍यक तो बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

डॉ. रणजित पाटील, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड


Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com