खंडोबाच्या पालीत भाजपचा येळकोट; राष्ट्रवादीला धूळ चारत तब्बल 25 वर्षांनंतर सत्तांतर

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News

उंब्रज (जि. सातारा) : पाल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव करत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. 15 जागेसाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा, तर राष्ट्रवादीच्या म्हाळसाकांत सह्याद्री पॅनेलला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. ग्रामपंचायतीत 1995 नंतर तब्बल 25 वर्षांनंतर परिवर्तन झाले आहे. 

पाल ग्रामपंचायतीच्या 15 जागेसाठी झालेल्या दुरंगी लढतीत राष्ट्रवादी पुरस्कृत म्हाळसाकांत सह्याद्री पॅनेल विरुद्ध भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेल अशी समोरासमोर चुरशीची लढत झाली. गेले 25 वर्षे एकहाती असलेल्या सत्तेला सुरुंग लागला आहे. स्वकीयांच्या अंतर्गत कुरघोडीवर म्हाळसाकांत पॅनेलला फटका बसला असून, उमेदवारीवरून स्वकीयांचा सुरू असलेल्या अंतर्गत धुसफूसीचा फायदा भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलला झाला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत म्हाळसाकांत पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवराज पाटील यांनी केले. भाजप पुरस्कृत सहकार पॅनेलचे नेतृत्व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले. राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष यांच्या गावातील निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत सत्तांतर झाले आहे. 

भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेल : प्रकाश जगताप, शिवराज पाटील, गणेश खंडाईत, जयश्री पाटील, सुनील काळभोर, सुनीता घाडगे, प्रशांत दळवी, कल्याणी इंजेकर, पवित्रा जगदाळे. 

म्हाळसाकांत आघाडी : कुमार काळभोर, सुजाता कुंभार, रंजना साळुंखे, धनंजय खंदारे, इंदुमती गोरे, सुवर्णा पवार. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com