पृथ्वीराज चव्हाण-विलासराव पाटील उंडाळकरांचे मनोमिलन यशस्वी; अपक्षांचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाण-विलासराव पाटील उंडाळकरांचे मनोमिलन यशस्वी; अपक्षांचे आव्हान

विंगमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात घडामोडीत येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये विकास माने अणि सतीश खबाले दोन जिवलग मित्र एकमेकांच्याविरोधात उभे आहेत. ते एकमेकांच्याविरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे त्या लढतीकडे आता विभागाचे लक्ष आहे. दोघेही भारतमाता गणेश मंडळाचे खास कार्यकर्ते आहेत.

पृथ्वीराज चव्हाण-विलासराव पाटील उंडाळकरांचे मनोमिलन यशस्वी; अपक्षांचे आव्हान

विंग (जि. सातारा) : राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या विंगसह विभागातील प्रमुख गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक पातळीवर येथील ग्रामपंचायतीसाठी विलासराव पाटील उंडाळकर (काका) विरोधात पृथ्वीराज चव्हाण (बाबा), संयुक्त भोसले गट आमने-सामने ठाकले आहेत. कोळे, येणके, पोतलेत काका-बाबा मनोमिलन यशस्वी ठरले आहे. त्यामध्ये येरवळे आणि येणकेची वाटचाल बिनविरोधच्या दिशेने सुरू आहे. गटाकडून उमेदवारी डावललेल्या अपक्षांनी मात्र अर्ज भरून आव्हान निर्माण केले आहे.
 
ऑगस्टमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका आहेत. त्यात विंगसह विभागातील कोळे, येणके, पोतले, अंबवडे, घारेवाडी, शिंदेवाडी, बामणवाडी आदी प्रमुख गावच्या ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. तत्पूर्वी गटाकडून निश्‍चित उमेदवारांनी 30 डिसेंबरअखेर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी देताना वाडा आणि भावकीचा विचार केला आहे. त्यातच अपक्षांनी अर्ज दाखल करून आव्हान उभे केले आहे. बहुतांश ठिकाणी भाजपविरोधात काका-बाबा गट एकत्र आले आहेत.

फास्टॅगच्या बंधनावर तासवडे, आनेवाडीत उसळणार विराेधाची लाट? 

येथील ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी 41 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी काका गटाविरोधात बाबा आणि भोसले गट एकत्र आला आहे. मात्र, राजकीय मतभेदातून भोसले गटाचे काही कार्यकर्ते काका गटासोबत गेले आहेत. त्यामुळे रंगत वाढली आहे. त्यातच वॉर्ड फेररचनेमुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. येरवळे आणि येणकेची वाटचाल बिनविरोधच्या दिशेने सुरू आहे. कोळे आणि पोतलेत भाजपविरोधात काका-बाबा मनोमिलन यशस्वी ठरले आहे. गटाकडून डावललेल्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान निर्माण केले आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र आहे. घारेवाडीत नऊ जागांसाठी दोन वॉर्डात तिरंगी, तर एका वॉर्डात दुरंगी लढत आहे. काका, बाबा आणि भोसले गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी प्रचार वेगाने सुरू आहे. निश्‍चित उमेदवारांनी आता वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिला आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा आत्तापासूनच सर्रास वापर सुरू आहे. सोमवारी (ता. 4) अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होईल.

माण तालुक्यात बिनविरोधला तिलांजली; स्थानिक गटांतच रंगणार लढती  

विंगमध्ये दोन मित्रांमध्ये लढत
 
विंगमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात घडामोडीत येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये विकास माने अणि सतीश खबाले दोन जिवलग मित्र एकमेकांच्याविरोधात उभे आहेत. ते एकमेकांच्याविरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे त्या लढतीकडे आता विभागाचे लक्ष आहे. दोघेही भारतमाता गणेश मंडळाचे खास कार्यकर्ते आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Web Title: Grampanchayat Election Prithviraj Chavan Vilasrao Patil Undalkar Satara News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India
go to top