सातारा पोलिस दलावर कोसळला दुःखाचा डोंगर

भद्रेश भाटे | Saturday, 25 July 2020

शहरातील वाढत्या संख्येमुळे जीवनावश्‍यक व्यवहार सोडले, तर लागण होण्याच्या भीतीने स्वतःहून बहुतेकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. स्थानिक प्रशासनाने संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे व लॉकडाउनमुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. दवाखाने व औषध दुकाने वगळता किराणा व इतर सर्व दुकाने बंद असल्याने सर्वसामान्य व हातावर पोट असलेल्या मजुरांची व लोकांची मोठी गैरसोय होत आहे.

वाई : वाई पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार (वय 51) यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. 
मागील आठवड्यात वाई पोलिस ठाण्यातील 16 कर्मचारी बाधित झाले होते. यातील अनेक कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, यातील एका पोलिस हवालदारावर उपचार सुरू होते. त्यांना मधुमेह व हृदयविकाराचा त्रासही होता. उपचारादरम्यान पक्षघाताचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना पुणे येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती मागील दोन दिवसांत सुधारली होती.
व्वा... या हॉस्पिटमध्ये 392 कोरोना बाधितांवर मोफत उपचार 

शुक्रवारी (ता.24) दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना श्वसन यंत्रणेचा आधार देण्यात आला होता. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी येताच पोलिस दलावर दुःखाचा डोंगर कोसळला. वाई पोलिस ठाण्यावर शोककळा पसरली होती. त्यांनी सातारा मुख्यालय, मेढा, महाबळेश्वर, वाई आदी ठिकाणी सेवा बजावली होती. त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान वाई  तालुक्‍यात ग्रामीण भागात व शहरात कोरोना बाधिताच्या संख्येचा आलेख दररोज वाढत आहे. गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 24 नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्‍यात आजपर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक गावात दररोज कोरोनाचा शिरकाव होत होता. मात्र, शहरात शिरकाव केल्यानंतर कोरोनाचा फेलाव झपाट्याने पसरला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या किसन वीर चौक, धर्मपुरी, ब्राह्मणशाहीत काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शहराच्या चारही बाजूने असणाऱ्या उपनगरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरासह तालुक्‍याला कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराभोवती असणाऱ्या सिद्धनाथवाडी, सोनगीरवाडी, शहाबाग, सह्याद्रीनगर, दत्तनगर, जेजुरीकर कॉलनी, या उपनगरांत कोरोनाचे मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ओळखला जाऊ लागला आहे.

गुजरातला चोरुन नेत असलेली वाळू महाराष्ट्रातील 'या' तहसीलदारांनी राेखली

सातारा : सायन्स, डीजी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, मग हे वाचाच

गेल्या 15 दिवसांत एकही कोरोना रुग्ण न आढळल्याने वाईच्या पश्‍चिम भागाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होताना रेणावळेत कोरोनाचा बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील वाढत्या संख्येमुळे जीवनावश्‍यक व्यवहार सोडले, तर लागण होण्याच्या भीतीने स्वतःहून बहुतेकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. स्थानिक प्रशासनाने संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे व लॉकडाउनमुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. दवाखाने व औषध दुकाने वगळता किराणा व इतर सर्व दुकाने बंद असल्याने सर्वसामान्य व हातावर पोट असलेल्या मजुरांची व लोकांची मोठी गैरसोय होत आहे. तालुक्‍यातील प्रत्येक गावात दररोज नवीन बाधित सापडत असल्याने तालुक्‍याची धडधड वाढत चालली आहे. काल आलेल्या अहवालानुसार, तालुक्‍यातील ग्रामीण भागातील नवीन गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने शहरासह ग्रामीण भागतील नागरिकांची झोपच उडाली आहे. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने तालुक्‍यावर दुहेरी संकट आ वासून उभे आहे.

तेरा नगरसेवकांसह 50 जण क्वारंटाइन; कऱ्हाड पालिका इमारत सील

गुरुवार अखेर तालुक्‍यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण 361 असून, त्यापैकी 179 बरे झाले. 172 उपचार घेत आहेत, तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री आलेल्या अहवालात तालुक्‍यातील शेंदुरजणे येथील 65, 60, 35, 40 वर्षीय पुरुष, 56, 27 वर्षीय महिला, एक वर्षाची बालिका, गोवेदिगर येथील 35 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, पसरणी येथील 64 वर्षीय पुरुष, सिद्धनाथवाडी येथील 69, 36 महिला, 14 वर्षांची युवती, 8 वर्षांची बालिका 36, 40 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 37 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, भुईंज येथील 57, 20 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, वाई येथील 45 वर्षीय पुरुष, शहाबाग येथील 27 वर्षीय महिला, गंगापुरी येथील 28 वर्षीय महिला, रेणावळे येथील 60 वर्षीय महिला, दत्तनगर, वाई येथील 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

गर्दीकडे होतोय प्रशासनाचा कानाडोळा 

ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी वाई शहरात येऊन प्रचंड गर्दी करतात. याकडे प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. त्यामुळे वाहनांसह पादचाऱ्यांचीही गर्दी दिसत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने अनेक उपाय सुचविले आहेत. मुंबईमध्ये नोकरीनिमित्त गेलेल्या नागरिकांची घरी येण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब होत असल्याने कोरोना साखळी तुटताना अडचण निर्माण होत आहे. 

Edited By : Siddharth Latkar

 

First martyr from Satara police in the war agaist Covid 19. HC Gajanan Nanavare.
Your sacrifice won't be forgotten.
RIP.

— Tejaswi Satpute @SataraSP (@TejaswiSatpute)