राजेश टाेपेंची सिव्हिलला क्लिन चीट; डॉ. अमोद गडीकरांची गच्छंती

सिद्धार्थ लाटकर | Sunday, 9 August 2020

एका प्रश्‍नावर टोपे म्हणाले जिल्हा रुग्णालयात भ्रुण हत्याबाबतची तक्रार आमच्यापर्यंत पोचली. जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. उपसंचालक कार्यालयास देखील तांत्रिक गोष्टींची पाहणी करण्याची कडक सूचना केल्या आहेत.

सातारा : कोरोनाची संख्या वाढत असल्याने याचा आढावा घेण्यासाठी आज कऱ्हाडात कोल्हापूर व सातारा जिल्ह्याची एकत्रित बैठक खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीनंतर श्री. टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
श्री. टोपे म्हणाले, सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या दोन्ही जिल्ह्यांत काळजीचे वातावरण झाले आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर वाढू नये, यासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत. लक्षणे असलेले व लक्षणे विरहित असलेल्या रूग्णांचे वेळेत निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी साताऱ्यात आरटीपीसीआर ही तपासणी लॅब आम्ही सुरू करत आहोत. उद्याच (सोमवार) त्याचा प्रारंभ होईल. परिणामी येथील रुग्णांचे अहवाल तातडीने उपलब्ध होतील असा विश्‍वास टोपे यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात भाजपाचे राजे; राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या

सातारा जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. दोन्ही जिल्ह्यात शासकीय रुग्णालयाचे प्रश्न होते. येथे सर्जन, वैद्यकीय अधिकारी यांचा तुटवडा आहे. मोठ मोठ्या शस्त्रक्रिया सातारच्या जिल्हा रूग्णालयात होणे आवश्‍यक आहे, त्यासाठी तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी काही तातडीने निर्णय आम्ही घेतले आहेत. सातारा जिल्हा रूग्णालयातील नेतृत्व बदलाची आवश्‍यकता होती. त्याचा ही निर्णय घेतला आहे. 

हॉटस्पॉट कराडमध्ये रस्त्यावर वाढदिवस; 17 युवकांची उचलबांगडी, बेजबाबदारांना पालकांसमक्ष समज

खासगी रुग्णालयात रूग्णांना घेतले जात नाही अशी तक्रार आमच्याकडे आली. कोरोना संसर्गाचा धोका असल्याने रुग्णास नाकारला जात आहे, हे योग्य नाही. त्यामुळे खासगी रूग्णालयांनी कोणत्याही रूग्णास नाकारू नये. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत, त्यांनी अशा रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी सूचना त्यांना केल्याचे नमूद केले. दरम्यान रुग्णांचे लवकरात लवकर निदान होण्यासाठी एक - 15 असे प्रमाण आवश्‍यक आहे. शासनाच्या माध्यमातून रुग्णवाहिकांची उपलब्धता होण्यासाठी पुर्तता करण्यात आली आहे. आवश्‍यकता भासल्यास सातारा जिल्ह्यात रुग्णवाहिका दिली जाईल. याबरोबरच एका प्रश्‍नावर टोपे म्हणाले जिल्हा रुग्णालयात भ्रुण हत्याबाबतची तक्रार आमच्यापर्यंत पोचली. जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. उपसंचालक कार्यालयास देखील तांत्रिक गोष्टींची पाहणी करण्याची कडक सूचना केल्या आहेत. प्राथमिक स्तरावर याबाबत जिल्हा रुग्णालय यास जबाबदार नाही असे दिसून येते असेही टोपेंनी नमूद केले.

...उदयनराजेंनी पवार साहेबांना केला फोन : राजेश टोपे

सिव्हिलची चूकच नाही 

साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पीटलसंदर्भात तक्रारी वाढल्या होत्या. मध्यंतरी पाचव्यांदा प्रसुती झालेल्या महिलेच्याबाबतीत तक्रार आहे. त्याचीही माहिती मी जिल्हाधिकारी यांच्याकडुन माहिती घेतली. त्यांनी एक चौकशी समिती नेमली आहे. ती महिला ज्यावेळी सिव्हील हॉस्पीटलमध्ये आले त्यावेळी रक्तस्र्त्राव होत होता. त्यामुळे प्राथमिक दृष्टीने त्यात सिव्हील हॉस्पीटलची चुक दिसत नाही. सिव्हीलचा हॉस्पीटलचा कारभार आम्ही नक्कीच सुधारु, अशी ग्वाहीही आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली.