वादळी वाऱ्यासह तारळेत जोरदार पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

दोन दिवस हुलकावणी दिलेल्या पावसाने सायंकाळी या परिसराला झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचा कडबा भिजून नुकसान झाले आहे.
Rain
Rainesakal

तारळे : दोन दिवस हुलकावणी दिलेल्या पावसाने काल सायंकाळी या परिसराला झोडपून काढले. शेतकऱ्यांचे कडबा भिजून नुकसान झाले. बांबवडेत वीज पडून नारळाचे झाड जळाले. आंब्यासह अन्य पिकांचे नुकसान झाले. गेले दोन-तीन दिवस सलग परिसरात पाऊस सुरू आहे. मात्र, तारळेसह विभागाला अपवाद वगळता पावसाने हुलकावणी दिली होती.

काल दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात सुमारे दीड-दोन तास पाऊस सुरू होता. कडवे परिसरालाही पावसाने झोडपून काढले. त्यामुळे ओढे-नाले भरून वाहिले. तारळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. विजांचा मोठ्या प्रमाणात कडकडाट सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. बांबवडे येथे वीज पडून नारळाचे झाड जळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com