माणसह कुळकजाई, श्रीपालवणात पावसाची जोरदार हजेरी; बळीराजाचे मोठे नुकसान

बुधवारी दुपारी माणमध्ये काही ठिकाणी गारांसह जोरदार पाऊस पडला, तर बहुतांशी ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍याने तोंडचे पाणी पळवले.
Heavy Rain
Heavy RainHeavy Rain

दहिवडी (जि. सातारा) : बुधवारी दुपारी माणमध्ये काही ठिकाणी गारांसह जोरदार पाऊस पडला. तर बहुतांशी ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍याने तोंडचे पाणी पळवले. बुधवारी दुपारी साधारण तीनच्या सुमारास माण तालुक्यातील कुळकजाई, श्रीपालवण, वारुगड परिसर टाकेवाडी, बिजवडी आदी ठिकाणी आभाळ झाकोळून आले. अन पाठोपाठ जोरदार वारे सुटले. त्यानंतर काही वेळातच पावसाच्या टपोऱ्या थेंबांसोबत गारांचा मारा सुरु झाला. अल्पावधीतच या दोन्हींचा वेग वाढला व जोरदार वृष्टी झाली. काही मिनिटांच्या या गारांसह पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले.

हा गारांसह पडलेला पाऊस फायदेशीर कमी अन हानीकारक जास्त ठरला आहे. या पावसाने झोडपल्याने टोमॅटो, कांदा, कांदा बी, कलिंगड, काकडी, कोबी, आंबा आदी पिकांचे, फळझाडांचे मोठे नुकसान झाले. पाने झडली, फळे गळाली, फळांना जखमा झाल्या. यासोबतच जनावरांना सुध्दा याचा मार बसला. अनेक संकटांना तोंड देत असलेल्या बळीराजाला आजच्या गारपिटीने पुन्हा एकदा संकटात टाकले आहे.

आश्चर्य म्हणजे परिसरात असा पाऊस पडत असताना ज्या ठिकाणी नेहमी इतरांपेक्षा जास्त पाऊस पडतो त्या बोथेत कडक ऊन होते. शिरवली, भांडवली, मलवडी या परिसरात भितीदायक अशा सोसाट्याच्या वार्‍याने शेतकर्‍यांची घाबरगुंडी उडाली. काढणी, काटणी करुन शेतात ठेवलेला कांदा झाकताना शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. मात्र या परिसराला पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांनी सुटकेचा श्वास सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com