
सुगीच्या दिवसांत गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. आधीच कोरोनाने शेतकऱ्यांच्या मालाला कसलाच दर नाही. त्यात आता या पावसाने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांचे पंचनामे व शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शासकीय विभागातील कोणीही आलेले नाही.
वाईच्या पूर्व भागात मुसळधार; पिकांचे मोठे नुकसान!
भुईंज (जि. सातारा) : गेले चार ते पाच दिवस वाई तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडत आहे. सायंकाळी चार वाजल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. लगडवाडी गावात असाच तीन दिवस पाठीमागे ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गावापासून डोंगर जवळ असल्याने तेथील पाणंद रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून लोकांनी त्या रस्त्याने ये-जा करणे बंद केले आहे, तसेच लगडवाडीच्या शिवारात शेत जमिनीला असलेले बांध हे अतिवृष्टीमुळे फुटले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता सुगीच्या दिवसांत गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. आधीच कोरोनाने शेतकऱ्यांच्या मालाला कसलाच दर नाही. त्यात आता या पावसाने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
वादळी पावसाने दाणादाण; कऱ्हाडमध्ये घरांत, दुकानांत घुसले पाणी
पिकांचे पंचनामे व शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शासकीय विभागातील कोणीही आलेले नाही. शासनाच्या जलसंवर्धन अभियानांतर्गत "पाणी आडवा पाणी जिरवा' या योजनेतून तीन मोठे तलाव बांधले गेले आहेत. ते देखील पावसामुळे फुटले गेले आहेत. त्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसल्याने पिके पाण्याखाली जाऊन कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अशा नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत असल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Web Title: Heavy Rain Wai Area Satara News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..