'या'मुळेच जिल्ह्याच्या राजकारणाला मिळतेय वेगळी दिशा; गृहराज्यमंत्री सतेज पाटलांची भावना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

या मेडिकल कॉलेजचा पाया पृथ्वीराज चव्हाण यांनी घातला आहे. परवाच उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. त्यांनीही हा प्रश्न तडीस नेण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले आहेत.

मलकापूर : मागची पाने मागे टाकून विकासाचे पाऊल टाकायचे आहे. एक पाऊल मागे- पुढे सरकून पुढे जायचे आहे. ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या भेटीला गेले. त्यांची विचारपूस केली हा कृष्णाकाठचा गुणधर्म आहे. तोच आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे. या एकीमुळेच जिल्ह्याच्या राजकाणाला वेगळी दिशा देण्याचे काम निश्‍चित होईल, असा आशावाद गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला.
काॅंग्रेसच्या माेठ्या नेत्याला घेरण्याची भाजपची खेळी 
 
विविध कार्यक्रमानिमित्त मलकापुरात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""जिल्ह्यातील जुन्या लोकांच्या कामांची नोंद इतिहासात होत राहाते. त्यांनी एका विचाराने कामे करून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आहे. तरुण पिढीने त्यांच्या विकासाच्या दृष्टीचा व विचारांचा आदर्श घेतला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील- उंडाळकर व श्रीनिवास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद आम्हा तरुणांना लाभल्यास आम्ही जनतेच्या सेवेत आणि परिसराच्या विकासात कोठेही कमी पडणार नाही, तसेच सातारा जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे हे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वप्न होते. ते आज साकार होताना दिसत आहे.

प्रवेशासाठी खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर गुन्हा, तंत्रशिक्षण संचालनालयाचा प्रवेश रद्दचा इशाराही

या मेडिकल कॉलेजचा पाया पृथ्वीराज चव्हाण यांनी घातला आहे. परवाच उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. त्यांनीही हा प्रश्न तडीस नेण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. आगामी कालावधीत हे कॉलेज लवकरच उभे राहील. त्यासाठी शासन दरबारी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा; अन्यथा तुमच्यावरही हाेऊ शकते कारवाई

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Satej Patil Visits Malkapur Near Karad