esakal | लिफ्ट दुरुस्तीकडे दुर्लक्ष चिंताजनक,‘सिव्हिल’मध्ये रुग्णांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

लिफ्ट दुरुस्तीकडे दुर्लक्ष चिंताजनक,‘सिव्हिल’मध्ये रुग्णांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय

sakal_logo
By
- प्रवीण जाधव

सातारा : कोरोना (Corona) संसर्गात नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील (Hospital) अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच उपचारासाठी दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांना बंद लिफ्टमुळे त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रुग्णांची ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा जास्त झटका बसतो आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या रुग्णालयातील लिफ्टच्या दुरुस्तीबाबत गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष चिंताजनक आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावर मार्ग काढण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गापासून जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे. वॉर्ड वाढलेले आहेत; परंतु कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कर्मचारी कपातीची मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये एकट्या जिल्हा रुग्णालयात ४० जणांना कमी करण्यात आले; परंतु कामाचा ताण तेवढाच आहे. जिल्हा रुग्णालयात आधुनिक उपचार देण्याच्या घोषणा नेहमीच होत आहेत. कर्मचाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा होत आहे; परंतु त्यांना मूळच्या पायाभूत सुविधा पुरविण्याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा: मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

जिल्हा रुग्णालयाच्या रचनेनुसार महिलांच्या वैद्यकीय शस्त्रक्रिया, भाजलेल्या रुग्णांचा, पुरुषांच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांचा विभाग व प्रसूती कक्ष वरच्या मजल्यावर आहे. रुग्णालयाचे मुख्य शस्त्रक्रियागृहही वरच्या मजल्यावरच आहे. त्यामुळे रुग्णालयातील बहुतांश रुग्ण हे वरच्या मजल्यावरच असतात. खालच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वरच्या मजल्यावर, तर वरच्या मजल्यावर असणाऱ्यांना एक्‍सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी यासाठी खालच्या मजल्यावर यावे लागते. दिवसभरात अशा सुमारे ३० ते ४० रुग्णांना, तसेच रुग्णालयीन कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाइकांना खाली- वर ये- जा करावे लागते. त्यासाठी लिफ्टचा वापर आवश्‍यकच असतो. गंभीर किंवा चालता न येणाऱ्या रुग्णांना कर्मचाऱ्यांनाच खाली-वर करावे लागते; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद आहे. त्यामुळे वृद्ध व गंभीर रुग्णांना वॉर्डमध्ये नेण्यासाठी कर्मचाऱ्यांना रॅम्पचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक होत आहे, तसेच रॅम्पवरून नेताना रुग्णाचीही हेळसांड होत असते. एखादा जादा वजनाचा रुग्ण रॅम्पवरून नेताना कर्मचाऱ्याचा दम निघाला, तर त्या रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. त्याचबरोबर गर्भवती महिला व गंभीर आजाराच्या रुग्णांची हेळसांड होत आहे.

हेही वाचा: कोरोना योध्दयांना कुटुंबप्रमुखाची साथ; त्याचबरोबर समाजात ‘पोलिस’ मैत्र रूजले 

कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडे आर्जव

दरम्यान, लिफ्ट सुरू करण्याबाबत कर्मचाऱ्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे आर्जव केली आहे; परंतु त्याची गंभीरतेने दखल घेतली जात नाही. त्यामुळे रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. ती थांबविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

loading image
go to top