esakal | कऱ्हाडला 80 जणांवर हद्दपारीची तलवार! कारवाईच्या भीतीने संशयित पसार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

उत्सव काळात शांतता राहावी, यासाठी कडक कारवाईची पावले उचलली असून, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. उर्वरित ८० जण हद्दपारीच्या भीतीने नोटीस मिळण्यापूर्वी गायब झाले आहेत.

कऱ्हाडला 80 जणांवर हद्दपारीची तलवार! कारवाईच्या भीतीने संशयित पसार

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांवर थेट हद्दपारीचे प्रस्ताव पोलिसांनी हाती घेतले आहेत. कऱ्हाड शहरातील आत्तापर्यंत १५० जणांच्या प्रस्तावातील ७० जणांना हद्दपार केले आहे. उत्सव काळात शांतता राहावी, यासाठी कडक कारवाईची पावले उचलली असून, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. उर्वरित ८० जण हद्दपारीच्या भीतीने नोटीस मिळण्यापूर्वी गायब झाले आहेत.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

कऱ्हाडची गुंडगिरी संपवण्यासाठी पोलिसांनी काही महत्त्‍वाच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी उत्सव कालावधी एक संधी म्हणून पोलिसांनी या काळात कारवाईचा धडाका लावलेला आहे. शहरातील तब्बल १५० पोलिस रेकॉर्डवरील संशयितांना हद्दपार करण्याचे काम पोलिस करत आहेत. रेकॉर्डवरील संशयितांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. गणेशोत्सवात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. त्यांच्यावर कारवाईही सुरू आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांनी ७० जणांना हद्दपारही केले आहे. उर्वरितांना नोटीस देवून थेट हद्दपार केले जात आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे ८० जणांनी नोटीस मिळण्यापूर्वी गायब होण्याचा फंडा वापरला आहे. पोलिसांनी उचललेल्या कडक पावलामुळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयितांची पळताभुई सुरू आहे, हेही निश्चित.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

तालुक्यात केवळ तीन

कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याने केवळ तिघांना हद्दपार केले आहे. त्याउलट शहर पोलिसांची हीच हद्दपारी तब्बल १५० च्या घरात जाते आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरातील गुंडांच्या हालचालीवर पोलिसांची करडी नजर आहे. तालुक्यात जमिनीवरून तर शहरात केवळ टोळी वाढविण्यासाठी क्राईम होते आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी अधिक धोकादायक ठरत आहे.

loading image
go to top