प्रशासकीय कर्मचा-यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम : मनोज जाधव

प्रशासकीय कर्मचा-यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम : मनोज जाधव

सातारा : जगावर कोरोनाचं भयानक संकट ओढावलं आहे. आज जिल्ह्यात जवळ-जवळ १७ हजार नागरिक कोरोनामुक्त झालेत. या महामारीत सर्वच नागरिकांनी विशेष प्रकारची काळजी घ्यावी, तसेच जिल्हा परिषदेचे कोरोना बाधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून विशेष यंत्रणा उभारून काळजी घेतली जात आहे. सर्व बाधित कर्मचाऱ्यांनी  या यंत्रणेतील नियुक्त असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सर्व माहिती वेळेवर देऊन आणि सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलासा मिळावा, मार्गदर्शन मिळावे म्हणून तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर यंत्रणा उभारली आहे. दूरध्वनीवरून त्यांचे समुपदेशन करून मार्गदर्शन दिले जात आहे. त्याचा फायदा करून घ्यावा, सहकार्य करावे व सर्व प्रकारची काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्याचप्रमाणे काटेकोरपणे नियम पाळावेत, असे देखील या पत्रकात म्हटले आहे. 

अंगणवाडीसेविका, प्राथमिक शिक्षक, आशाताई, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचारी सातत्याने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्यक्ष समाजात मिसळून काम करत असतात. त्यांचे संरक्षण खूप महत्त्वाचे ठरते, म्हणूनच हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यात आज पर्यंत जवळपास १७ हजार बाधित नागरिक पूर्णतः बरे झाले आहेत, त्यामुळे या बाधित कर्मचाऱ्यांनी आत्मविश्वास बाळगून पूर्ण खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील या पत्रकात नमूद केले आहे. होम आयसोलेशन असेल तर कोणती काळजी घ्यावी याबाबत सर्व ते मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये देखील काय काळजी घ्यावी याचे समुपदेशन केले जात असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com