esakal | पर्यटकांनाे! Covid 19 Test करुनच 'कास'ला या; आदेशाच्या अंमलबजावणीस प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांनाे! Covid 19 Test करुनच 'कास'ला या; आदेशाच्या अंमलबजावणीस प्रारंभ

जावळी तालुक्यातील अनेक जण रोजगारासाठी पुणे, मुंबई येथे गेलेले आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने हे चाकरमानी गावाकडे आल्यास पुरेशी दक्षता न घेतल्यास कोरोनाचा संसर्ग वाढेल त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतल्यास तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवणार नाही

पर्यटकांनाे! Covid 19 Test करुनच 'कास'ला या; आदेशाच्या अंमलबजावणीस प्रारंभ

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कडक निर्बंध जिल्ह्यात लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात कोविड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार यापुढे परराज्यातून अथवा परजिल्हयातून जावळी तालुक्यात येण्यासाठी किमान ७२ तास अगोदर कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश जावली तालुक्याचे परिक्षाविधीन  उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी काढले आहेत.

टोम्पे म्हणाले सध्या राज्यात तसेच देशांतर्गत कोविड १९ चे रुग्ण मोठ्या वाढत आहेत. महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत आहे. सातारा जिल्हयासह जावळी तालुक्यात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांची वाढ होत आहे. हा संसर्ग वेळीच रोखणे आवश्यक असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध निर्बंध घातले आहेत. परराज्य व पर जिल्हयातून जावळीत येणाऱ्यांवर आम्ही निर्बंध घातले आहेत. कोरोना चाचणी न करता येणाऱ्यांना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांचा चाचणी अहवाल येईपर्यंत त्यांनी विलगीकरण करुन राहणे आवश्यक आहे. 

एकदम झक्कास! काळजाचा ठोका चुकवणारा 1800 फूट कोकणकडा कोणेगावच्या गिर्यारोहकाकडून सर
 

या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक ग्राम दक्षता समिती अध्यक्ष यांनी करावयाची आहे. शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे संभाव्य लाँकडाउनच्या भितीने बाहेरील राज्य व मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या मोठ्या शहरात असलेले चाकरमानी आता पुन्हा गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे शहरातून येणाऱ्या लोकांमुळे संसर्ग होऊन तालुक्यात संसर्गाची साखळी वाढू नये या उद्देशाने उपविभागीय अधिकारी श्री. टोम्पे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून परजिल्हयातून येणाऱ्यांसाठी कोविड १९ टेस्ट अनिवार्य केली आहे. बाहेरील जिल्ह्यातून जावळी तालुक्यात येणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी स्थानिक ग्रामदक्षता समिती करेल. बाहेरून आलेल्या व्यक्तीची चाचणी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाईल. संबंधित व्यक्ती क्वारंटाईन राहावा यासाठी ग्रामदक्षता समितीवर जबाबदारी साेपविण्यात आली आहे. यामुळे कोरोनाबधितांची साखळी खंडित होण्यासाठी मदत होईल, असा विश्वासही श्री टोम्पे यांनी व्यक्त केला आहे.

बाहेरून जावळीत येणाऱ्या व्यक्तीची १० तासापूर्वी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असेल तर त्या व्यक्तीस गावात यायला हरकत नाही. मात्र बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची तपासणी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यासाठी ग्रामदक्षता समितीने प्रयत्न करून त्या व्यक्तीला क्वारंटाईन करून तपासणी अहवाल येईपर्यंत बाहेर फिरू नये यासाठी ही खबरदारी घेतली पाहिजे.

यापूर्वी ही प्रांताधिकारी श्री. टोम्पे यांनी जलसंधारण साठी केळघर विभागात चांगले काम केले होते. शासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांना एकत्र आणून श्रमदानातून केळघर विभागात जलसंधारणाचे भरीव काम त्यांनी केले होते. जावळी तालुक्यातील अनेक जण रोजगारासाठी पुणे, मुंबई येथे गेलेले आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने हे चाकरमानी गावाकडे आल्यास पुरेशी दक्षता न घेतल्यास कोरोनाचा संसर्ग वाढेल त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतल्यास तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवणार नाही.

कास हे जगप्रसिद्ध पठार हे जावळी तालुक्याच्या हद्दीत येते येथेही कोल्हापूर, पुणे, मुंबई, तसेच शेजारील जिल्ह्यातून पर्यटनासाठी कासला पर्यटक येत असतात. मात्र बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची देखील कोरोना चाचणी स्थानिक ग्राम दक्षता समिती घेईल अशी माहिती श्री. टोम्पे यांनी दिली.

खंबाटकी घाटात अग्नितांडव; का झाला गाड्यांचा स्फोट?, वनक्षेत्रपाल सांगतात नेमकं कारण..

क-हाड : लसीचा साठा संपला; तीन केंद्र झाली बंद

चिंताजनक! साताऱ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, या रुग्णालयांत शिल्लक आहेत बेड, व्हेंटिलेटर, ICU; जाणून घ्या नेमकी स्थिती..

रूपाली चाकणकरांनी अध्यक्षपदासाठी सूचविलेल्या नावास राष्ट्रवादीतूनच विरोध; शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या निर्णयाकडे लक्ष 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top