पदवीधर निवडणुकीतील सेनेच्या अपयशावर जयंत पाटलांचे भरपाईचे संकेत
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज (शुक्रवार) काही काळ साता-यातील शासकिय विश्रामगृहात आले होते.
सातारा : शिक्षक, पदवीधर निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असेल तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज (शुक्रवार) काही काळ साता-यातील शासकिय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी अनाैपचारिक संवाद साधला. शिक्षक, पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या अपयशाबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता श्री. पाटील म्हणाले, विधान परिषदेची ही निवडणुक महाविकासने एकत्र लढली. आघाडीने उमेदवार उभे केले. त्यामध्ये काही ठिकाणी यश मिळाले तर काही ठिकाणी अपयश मिळाले.
जयंत पाटलांचे आश्वासन बोलाची कढी, बोलाचाच भात ठरले; 'जलसंपदा'त कुरबुर
कुणाला काय मिळाले ही परिस्थिती त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर अवलंबुन असते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असेल तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत श्री. पाटील यांनी दिली.