फेसबुकवरून भाषण ठाेकण्यापेक्षा सुविधा द्या; भाजप आमदार आक्रमक

रुग्णालयांना लागणाऱ्या उपाययोजना त्वरित केल्या नाहीत, तर उद्रेक होईल
Jaykumar Gore
Jaykumar GoreSystem

बिजवडी (जि. सातारा) : दहिवडी येथील कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांची सुविधांअभावी हेळसांड होत आहे. या ठिकाणी आवश्‍यक वैद्यकीय स्टाफची कमतरता आहे. रुग्णांना निकृष्ट जेवण दिले जात आहे. सारखे फेसबुक लाइव्ह करून मोठी भाषणे करण्यापेक्षा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर बाधितांना चांगले उपचार आणि सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना आमदार जयकुमार गोरे यांनी रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. गोरे म्हणाले, ""दहिवडीतील शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या 38 रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसा वैद्यकीय स्टाफ नाही. एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन नर्स रात्रं-दिवस काम करून रुग्णांवर उपचार करत आहेत. बाधित रुग्णांना मिळणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. बेड्‌सवर टाकायला बेडशिट्‌सही नाहीत. सर्वत्र अस्वच्छता आहे. योग्य सुविधा नसल्याने रुग्णांना येथे उपचाराचे तर सोडाच थांबणेही मुश्‍किल झाले आहे.''

'सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्‌सची सेवा करावयाची आहे'

ते म्हणाले, ""दहिवडी सीसीसीमध्ये बाधित रुग्णांना सुविधा मिळत नसल्याबद्दल माहिती घेण्यासाठी प्रांत आणि तहसीलदारांना फोन केला तर ते संपर्कहिन आहेत. जिल्ह्याचे अधिकारी सारखे फेसबुक लाइव्हद्वारे मोठी भाषणे झोडून जनतेवर निर्बंध लादत आहेत. ते गरजेचेही आहे. मात्र, हे करताना त्यांनी बाधित रुग्णांवर योग्य उपचार आणि योग्य सुविधा मिळतात की नाही, हे पाहणेही गरजेचे आहे. आवश्‍यक असणारा औषधसाठा व वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्याऐवजी खालच्या अधिकारी, कर्मचारी वर्गावर रोष झाडायचे काम केले जात आहे. बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांवर अंमलबाजणी करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.''

माण तालुक्‍यात अनागोंदी कारभार सुरू आहे. रुग्णांची हेळसांड मी खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत बाधितांचा जीव वाचला पाहिजे, त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना त्वरित केल्या नाहीत, तर उद्रेक होईल, असा इशाराही गोरे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com