कदमांचा प्रामाणिकपणा; बॅंक ऑफ महाराष्ट्रात सापडलेले सोन्याचे दागिने, पैसे केले परत

ऋषिकेश पवार | Saturday, 26 December 2020

या प्रामाणिकपणाबद्दल श्री. कदम व श्री. जाधव यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. 

विसापूर (जि. सातारा) : बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पुसेगाव (ता. खटाव) येथील शाखेत लता सूर्यवंशी यांचे अनावधानाने पडलेले कानातले सोन्याचे दागिने व पैशांची पर्स असा सुमारे 60 हजारांचा ऐवज औतकाठीचे काम करणाऱ्या जयसिंग कदम यांनी पुसेगावचे माजी उपसरपंच प्रकाश जाधव यांच्या माध्यमातून परत करून प्रामाणिकपणाची प्रचिती दिली. दरम्यान, या प्रामाणिकपणाबद्दल श्री. कदम व श्री. जाधव यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. 

भवानीनगर (पुसेगाव) येथे राहणाऱ्या लता सूर्यवंशी या महिला बचतगटाचे पैसे बॅंकेत भरावयास गेल्या असताना अनावधानाने त्यांचे पाच ग्रॅमचे कानातले दागिने व रोख रक्कम गुरुवारी हरवली. त्यांनी खूप शोधाशोध केली, पण ते सापडले नाहीत. त्याच दिवशी श्री. कदम हे औतकाठीच्या कामासाठी पुसेगाव येथे जाधव यांच्या शेतात आले होते. त्यावेळी ते आपल्या कर्जाच्या सीसीचे नूतनीकरण करण्यासाठी बॅंकेत गेले असता योगायोगाने त्यांना दागिने व पर्स सापडली. त्यांनी ही बाब लगेच श्री. जाधव यांना सांगितली. श्री. जाधव यांनी तत्काळ शोध घेतला असता दागिने व पर्स लता सूर्यवंशी यांचे असल्याचे कळून आले. श्री. जाधव यांनी विलंब न करता त्याच दिवशी कदम यांना सापडलेले दागिने व पर्स सूर्यवंशी यांना पोच केली.

प्रा. एन. डी.- सरोजताई यांना शरद- प्रतिभा पुरस्कार जाहीर
 

Advertising
Advertising

ठरलं तर; पुसेगावात महाविकास आघाडी लढणार ग्रामपंचायतीची निवडणूक

दरम्यान, हरवलेले कानातले दागिने व पैशांची पर्स परत मिळेल, असे वाटले नाही. प्रकाश जाधव यांच्या माध्यमातून पर्स परत मिळाली, तेव्हा त्यांचे व जयसिंग कदम यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते, अशी प्रतिक्रिया लता सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar