भाजपला धक्का देत 'पवार' पुन्हा राष्ट्रवादीत, खटाव तालुक्‍यात 'पावर' वाढणार!

हेमंत पवार  | Thursday, 19 November 2020

जानेवारी 2020 मध्ये हरणाई सूतगिरणीवर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जितेंद्र पवार यांची भेट झाली. तेव्हापासून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खटाव तालुक्‍यात चर्चा सुरू होती.

कऱ्हाड (जि. सातारा) : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि केलेली विकासकामे याचा विचार करून मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जितेंद्र पवार यांनी पुन्हा हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवार यांनी 2017 मध्ये पुसेसावळी जिल्हा परिषद गटात पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समितीचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरीचे निशाण हाती घेतले. अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी अपक्ष उमेदवारी करून तब्बल सहा हजार मते मिळवली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर नाराज असलेल्या पवार यांना भाजपने पक्षात घेतले. जानेवारी 2020 मध्ये हरणाई सूतगिरणीवर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. तेव्हापासून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खटाव तालुक्‍यात चर्चा सुरू होती. 

नितीशकुमारांची कारकीर्द संपविण्याचा भाजपचा डाव, चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप

सहकारमंत्री पाटील यांनीही मतदारसंघ मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. जोतिराम थोरात, भाऊसाहेब लादे, शिवाजी शिंदे, महादेव माने, पांडुरंग माने, श्रीमंत कदम, साधू मगर, बजरंग पवार, बापूराव माने, निवास पवार, धोंडीराम जगताप, श्री. मदने गुरुजी, दादासाहेब कदम, धनाजी पाटील, दिलीप यादव, दिनकर पाटील, सुदाम पिसाळ, दाऊद पटेल, तुषार माने, सचिन माने, अविनाश घार्गे, विजय पिसाळ, दादासाहेब दगडे, प्रताप शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे