
काॅग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो आहे. खासदारकी रद्द करणे म्हणजेच अघोषित आणीबाणी आहे.
Prithviraj Chavan : राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे म्हणजेच अघोषित आणीबाणी
- सचिन शिंदे
कऱ्हाड - काॅग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो आहे. खासदारकी रद्द करणे म्हणजेच अघोषित आणीबाणी आहे, अशी टिका काॅग्रेसचे नेत, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
काॅग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावरील झालेली कारवाई राजकीय सुड असल्याची टिका आमदार चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, सुरत कोर्टाचा निकाल आला त्याचवेळी त्यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे, याची आम्हाला जाणीव झाली होती. वास्तविक 2018-19 च्या निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी प्रचारसभेत केलेलं वक्तव्यवर मानहानिकारक खटला चालू होता. त्या खटल्याचा निकाल लागला आहे. त्यात शिक्षा सुद्धा सुनावली होती.
ज्याप्रकारे देशाचे पंतप्रधान मोदी यांना महागाईचे, बेरोजगारीचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयश आले आहे. त्या विरोधात राहुल गांधी यांनी उचललेली पावले, त्यांची भारत जोडो यात्रा किंवा परदेशात त्यांना लोकप्रियता मिळाली व मिळते आहे. त्यामुळे कुठे तरी नरेंद्र मोदी सरकार घाबरलेल दिसत आहे त्यामुळेच त्यांनी राहुल गांधीं यांच्यावर ही सुड भावनेने कारवाई केलेली आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी सरकारची अघोषित आणीबाणी आहे. याचे राजकीय उत्तर कोंग्रेस पक्ष देईलच तसेच न्यायिक लढाई सुद्धा आम्ही लढू.
ते म्हणाले, एखाद्याची खासदारकी रद्द होण्यासाठी दोन वर्षाची शिक्षा व्हावी लागते. ती शिक्षा सुरत कोर्टात झाली. त्या शिक्षेला स्थगीती न घेतल्याने लोकसभेने कारवाई केली आहे. मात्र या सगळ्या मागचा सुत्रधार मोदी आहेत. त्यामुळे ही कारवाई म्हणजे देशात लागलेली अघोषीत आणीबाणीच आहे.