क-हाडातील वाहतुकीत बदल; मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर पाेलिसांचा निर्णय

हेमंत पवार | Sunday, 17 January 2021

मतमोजणीचा निकाल पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची वाहने पार्किंग करण्याची सोय कल्याणी ग्राऊंड येथे करण्यात आली आहे.

कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 18) असून, त्याची मतमोजणी रत्नागिरी धान्य गोदामात होत आहे. त्यामुळे वाहतुकीत खंड पडून ती विस्कळित होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी दिली.
ओसरगाव तलावासाठी आमरण उपोषण  
 
रत्नागिरी धान्य गोदामात मतमोजणी होणार असल्याने विजय दिवस चौक ते रत्नागिरी धान्य गोदामाकडे जाणारा रस्ता, कार्वे नाका ते भेदा चौक जाणारा रस्ता, दत्त चौक ते भेदा चौक जाणारा रस्ता वाहनांकरिता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तसेच कार्वे नाकामार्गे शहरात येणारी वाहतूक झेंडा चौक ते कोळेकर हॉस्पिटलमार्गे पोपटभाई पेट्रोल पंपाकडे वळवण्यात आली आहे.

महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही; श्रीनिवास पाटलांच्या वक्तव्याने गाेंधळ

विजय दिवस चौकातून येणारी वाहने दत्त चौक ते नवीन तहसील कार्यालयासमोरून कोल्हापूर नाक्‍याकडे जातील व पोपटभाई पेट्रोल पंप ते भेदा चौकमार्गे विट्याकडे जाणारी वाहने दत्त चौकमार्गे विजय दिवस चौक येथे जातील. ही सोमवारी तात्पुरती पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertising
Advertising

साताऱ्यातील वाहतुकीत सोमवारी बदल; मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने येणारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची वाहने नवीन तहसील कार्यालय व तालुका पोलिस ठाण्याच्या पाठीमागील मैदानात पार्किंग केली जातील. मतमोजणीचा निकाल पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची वाहने पार्किंग करण्याची सोय कल्याणी ग्राऊंड येथे करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar