कऱ्हाड तालुक्यात पत्नीचा गळा चिरून खून; पती पोलिसांच्या ताब्यात

राजेंद्र ननावरे
Sunday, 30 August 2020

वैयक्तिक वादातून सौ. येडगे यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मलकापूर (जि. सातारा) : किरकोळ कारणावरून येथे महिलेचा गळा चिरून खून झाल्याची घटना आज (रविवार) सकाळी उघडकीस आली. सौ. मंगल दाजी उर्फ आनंदा येडगे (रा. अहिल्यानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खून प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीस ताब्यात घेतले आहे.
सातारा जिल्हा बॅंकेत युपीआय सेवा 

याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत आनंद येडगे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. येथील शिवाजी चौक परिसरात येडगे कुटूंब रहात आहे. सहायक पोलीस निरिक्षक सराटे, हवालदार पन्हाळे, हवालदार बर्गे घटनास्थळी दाखल झाले.

पाटण भूमिअभिलेख कार्यालयात तब्बल निम्मी पदे रिक्त 

पोलिसांनी येडगे यांच्या घरात जावून पाहिले त्यावेळी सौ. येडगे यांचा मृतदेह पडला होता. त्यांचा गळा चिरून खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी त्यांच्या पती दाजी उर्फ आनंदा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वैयक्तिक वादातून सौ. येडगे यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बाप्पांच्या विसर्जनासाठी दिवस, वेळेची नोंदणी करा : मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Crime News Husband Beats Wife In Malkapur