पाणबुडीला कऱ्हाडकरांचा ‘एसी’

सैन्यदलासाठी उद्योजक शेंडेंचे योगदान
karad system for ins wagshir submarine r g shenden got-respect
karad system for ins wagshir submarine r g shenden got-respectsakal

कऱ्हाड : ‘आयएनएस वागशीर’ ही पाणबुडी आज रक्षा सचिव डॉ. अजय कुमार यांच्या हस्ते भारतीय सैन्यदलात दाखल होणार आहे. त्यामुळे सैन्यदलाची ताकद वाढेल. त्या पाणबुडीसाठी लागणारी वातानुकुलित यंत्रणा येथील श्री रेफ्रीजरेशनचे आर. जी. शेंडे यांनी तयार करून दिली आहे. त्यामुळे कऱ्हाडचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोचला आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. ही पाणबुडी समुद्रावरून हवेत, जमिनीवर आणि समुद्रात गस्त घालताना गुप्तहेरगीचेही काम करणार आहे. युध्दातही ही पाणबुडी महत्त्‍वाची ठरणार आहे.

समुद्रात देखभाल करण्यासही ती सक्षम ठरणार आहे. या पाणबुडीची लांबी २२१ फूट असून ती ४० टक्के भारतीय बनावटीची आहे. उद्‌घाटन झाल्यानंतर आज ती समुद्रात सोडण्यात येईल. या पाणबुडीची वर्षभर चाचणी करण्यात येणार आहे. या पाणबुडीत कऱ्हाडच्या श्री रेफ्रीजरेशनचे आर. जी. शेंडे यांनी तयार केलेली वातानुकुलित यंत्रणा वापरण्यात आली आहे. त्याबद्दल माहिती देताना श्री. शेंडे म्हणाले, ‘‘गेली दहा वर्षे मी श्री रेफ्रीजेशनच्या माध्यमातून सैन्यदलासाठी काम करत आहे. यापूर्वी पाणबुडीसाठी फ्रेंच कंपनीची वातानुकुलित यंत्रणा वापरली जात होती. सध्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केलेली ‘आयएनस वागशीर’ पाणबुडी ही भारतीय बनावटीतून तयार करण्यात आली आहे.

मध्यंतरी जहाज बांधणी होत असलेल्या माझगाव डॉकचे पाणबुडीसाठीतील वातानुकुलित यंत्रणेसाठीचे टेंडर निघाले होते. पहिले ते फ्रेंच कंपनीची यंत्रणा वापरत होते. मात्र, भारतीय बनावटीची नवीन पाणबुडी करायची असल्याने मी टेंडर भरले होते. त्याचबरोबर भारतातील व अनेक पदरेशी कंपन्यांनीही ते टेंडर भरले होते. मात्र, सर्व परदेशी कंपन्यांच्या टेंडरमध्ये ‘श्री रेफ्रीजरेशन’ने बाजी मारून ते टेंडर घेतले. त्यानंतर त्याचा दर्जा तपासल्यानंतर माझगाव डॉकने ते मंजूर केले. त्यानंतर काम सुरू झाले. दोन वर्षे ती कार्यवाही सुरू होती. त्यासाठी मला पत्नी राजश्री आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. मला भारतीय सैन्यदलाच्या पाणबुडीचा एक हिस्सा होता आले, याचा आनंद आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com