कऱ्हाड : मुख्याधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे सभेतील गदाराेळावर पडला पडदा

कऱ्हाड : मुख्याधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे सभेतील गदाराेळावर पडला पडदा

कऱ्हाड ः लोकशाहीचा अनादर करणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा शब्दांत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या विरोधात नगरसवेकांनीच थेट निषेधाच्या घोषणा देत सभागृह गाजवले. 122 विषयांचा जम्बो अजेंडा घेऊन पार पडलेली पालिकेची ऑनलाइन सभा अंतर्गत वादाच्या मुद्यांवर गाजली. सहा तास झालेल्या मासिक सभेत नगरसेवकांनी अचानक दिलेल्या निषेधाच्या घोषणांनी वातावरण चिघळले. कोणाचे ऐकून न घेता नगराध्यक्षा मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप करत विषय मंजूर झालाच पाहिजे, असा दुराग्रह धरणाऱ्या एकाधिकारशाहीचा आम्ही निषेध करतो, असेही नगरसवेकांनी म्हटले.
 
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षतेखाली पालिकेची ऑनलाइन सभा नुकतीच झाली. 122 पैकी 90 विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. सहा विषय तहकूब ठेवण्यात आले, तर 26 विषयांवर वादळी चर्चा होऊन ते बहुमताने मंजूर झाले. सभेच्या प्रारंभीच इतिवृत्तावरून खडाजंगी उडाली. नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी तो विषय लावून धरला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पालिकेच्या सभेचे इतिवृत्त अद्यापही पूर्ण नाही. ते सात महिने झाले तरी अपूर्ण का, याचा खुलासा करावा, असे ते म्हणाले. यावर मध्यंतरी नगराध्यक्षा व त्यांचे कुटुंबीय आजारी असल्याने त्यावर सही झालेली नाही, असा खुलासा नगरसेवक विनायक पावसकर यांनी केला. त्याचवेळी प्रोसिडिंगमधील सहीला आलेले काही ठराव तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी बदलून दिले आहेत. त्यात जेसीबीचा विषय गंभीर आहे, असेही स्पष्टीकरण दिले. वाटेगावकर व लोकशाहीचे नेते सौरभ पाटील यांनीही विषय लावून धरला. त्यावरून खडाजंगी झाली.

बाळासाहेब म्हणतात, वयाच्या सत्तरीतही मी कोरोनाला गाडून आलो!

शेती उत्पन्न बाजार समितीच्या स्वागत कमानीच्या विषयास मंजुरी देण्याच्या विषयावरूनही नगरसवेवकांत वाद झाला. लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही बंद नव्हते, तर पालिकेने नोटीस देऊनही बाजार समितीने काम सुरू ठेवले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला आहे, त्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ती कारवाई पालिकेने का केली नाही, अशी विचारणा केल्यावर गदारोळ झाला. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी या विषयात जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितल्याने त्यावर पडदा पडला.

कोरेगाव पोलिसांचा फार्म हाऊसवर छापा; पनवेलचे चार अटकेत

नगराध्यक्षांच्या विनंतीवरून तत्कालीन मंत्री सुरेश खाडे यांनी पालिकेस निधी दिला. त्यातून करावयाच्या रस्त्यांमध्ये प्रभागातील रस्ते नसल्याने हा विषय तहकूब ठेवण्याची सूचना जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी केली. त्यावरून वाद झाला. नगराध्यक्षा शिंदे यांनी विषयास अगोदरच उशीर झाला आहे. निधी परत जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही रस्ते सुचवा. विषय मंजूर करावा, अशी भूमिका घेतली. नगराध्यक्षा विषय मंजूर करण्यावर ठाम होत्या. त्यावेळी बहुमताचा विषय आला. नगराध्यक्षा बहुमताचा अनादर करत असल्याचा आरोप करत लोकशाहीचा खून करणारांचा निषेध असो, अशी सभागृहात घोषणाबाजी करण्यात आली.

पुरस्कार रद्दमुळे सिंधुदुर्गात शिक्षक संघटना आक्रमक   

विद्युत दाहिनीची मागणी करा
 
विद्युत दाहिनीविषयी जनशक्तीचे नेते राजेंद्र यादव यांनी भूमिका मांडली. पालिकेने विद्युत दाहिनी उभी करावी, त्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचना केली आहे, त्यानुसार विद्युत दाहिनीसह कोविड सेंटर उभारणी करण्याबाबत श्री. चव्हाण यांच्याकडे निधी मागणीचा प्रस्ताव द्यावा, अशी मागणी श्री. यादव यांनी केली. त्यामुळे शहरात लवकरच विद्युत दाहिनीचा विषयही मार्गी लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com