कृष्णा, कोयना नदीकाठावर गणेश विसर्जनास बंदी, कऱ्हाड पालिकेची 'ही' पर्यावरणपूरक संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णा, कोयना नदीकाठावर गणेश विसर्जनास बंदी, कऱ्हाड पालिकेची 'ही' पर्यावरणपूरक संकल्पना

उत्सवाच्या पुढच्या काळातही मूर्ती संकलनासाठी पालिकेची वाहने कार्यरत राहतील. त्यासाठी पालिकेने 28 वाहने, पालिकेचे तब्बल 150 कर्मचारी, नदीपात्रात तीन बोटी तयार ठेवल्या आहेत.

कृष्णा, कोयना नदीकाठावर गणेश विसर्जनास बंदी, कऱ्हाड पालिकेची 'ही' पर्यावरणपूरक संकल्पना

कऱ्हाड : गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृष्णा व कोयना नदीकाठावर नागरिकांनी जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे गल्लोगल्ली जावून घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती संकलनाचे काम पालिकेने रविवारपासून (ता.23) सुरू केले. विसर्जित होणाऱ्या दीड दिवसाच्या गणेशमूर्ती पालिकेने जमा करून त्या विधिवत विसर्जित केल्या. त्यासाठी पालिकेने आठ मोठी वाहने शहरात ठेवली होती. प्रत्येक वाहनासोबत पाच कर्मचारी नेमले होते.

विघ्नहर्ता संकल्पनेतून साताऱ्यात काेरोना योद्ध्यांना सलाम 
 
पोलिसांनी मूर्ती विसर्जनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मूर्ती विसर्जित करण्यासाठी नदीकाठावर कोणालाच येऊ देण्यात येणार नाही. मूर्ती विसर्जन होणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्‌स लावून रस्ते बंद केले आहेत. रविवारी (ता.23) दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठीही तो नियम लागू होता. घरीच मूर्ती विसर्जित करा किंवा पालिकेच्या मूर्ती संकलन वाहनात पालिकेकडे मूर्ती द्या, असा नियम लागू केला होता. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मूर्ती संकलनासाठी पालिकेने मोठी आठ वाहने व त्या प्रत्येक वाहनासोबत किमान पाच कर्मचारी मूर्ती संकलन करत होते. गल्लोगल्ली जावून मूर्ती संकलनाचे काम सुरू होते. काहींनी पुढच्या वर्षी लवकर या जयघाेषात गणेशमूर्ती घरीच विसर्जित केल्या. 

अकरावी प्रवेशाची कट ऑफ लिस्ट शुक्रवारी; वायसी, डीजीला पसंती

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद

उत्सवाच्या पुढच्या काळातही मूर्ती संकलनासाठी पालिकेची वाहने कार्यरत राहतील. त्यासाठी पालिकेने 28 वाहने, पालिकेचे तब्बल 150 कर्मचारी, नदीपात्रात तीन बोटी तयार ठेवल्या आहेत. त्याशिवाय शहरातील 19 वेगवेगळ्या ठिकाणी कृत्रिम जलकुंडही उभारले आहेत. तेथेही नागरिकांनी स्वतःहून मूर्ती विसर्जित कराव्यात किंवा नदीपात्रात मूर्ती विसर्जित करण्यासाठी त्या मूर्ती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्याव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेने दोन मोठी शेततळी उभारली आहेत. तेथे मूर्ती विसर्जित केल्या जाणार आहेत.

गणेश विसर्जन आपल्या दारी चिपळूणकरांची पर्यावरणपूरक संकल्पना

Edited  By : Siddharth Latkar

loading image
go to top