पाेलिसांनी अवघ्या तीन तासांत खूनी पकडले; कऱ्हाडातील अल्पवयीन मुलांचा समावेश

पाेलिसांनी अवघ्या तीन तासांत खूनी पकडले; कऱ्हाडातील अल्पवयीन मुलांचा समावेश

कऱ्हाड : अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना काल (ता. 14) दुपारी येथील बारा डबरी परिसरात घडली. या खूनप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून तीन तासांतच तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांची माहिती अशी - आदित्य गौतम बनसोडे (वय 17, रा. बारा डबरी परिसर, कऱ्हाड) याच्यावर संशयिताकडून शस्त्राने वार करण्यात आले. पोटावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तो खाली पडला. त्याच वेळी हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. त्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

'कास'ला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; विकासनगरसह शाहूनगरच्या युवकास अटक

मारेकऱ्यांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली. याप्रकरणी गौतम बनसोडे यांनी फिर्याद दिली. त्या दरम्यान शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ तीनच तासांत संशयित तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चाकू जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. पाटील तपास करत आहेत.

काबाडकष्टाने पिकवलेल्या पपईला मिळतोय कवडीमोलाचा भाव; सातारा जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः रडकुंडीला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com