गुरुवार पेठेतील युवकाच्या खून प्रकरणी कऱ्हाडातील तिघे ताब्यात

गुरुवार पेठेतील युवकाच्या खून प्रकरणी कऱ्हाडातील तिघे ताब्यात

कऱ्हाड : येथील भाजी मंडईमध्ये एका युवकाचा फरशी डोक्‍यात घालून व धारदार शस्त्राने जुबेर जहांगीर आंबेकरी (वय 30, रा. गुरुवार पेठ, कुरेशी मोहल्ला, कऱ्हाड) यांचा खून करणा-या तिघा संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील हे आज (गुरुवार) सायंकाळी साडे सहा वाजता देणार आहेत.
 
जुबेर आणि संशयितांची येथील भाजी मंडईतील दुकानासमोरील रस्त्यावर मंगळवारी रात्री भांडण झाले. त्यामध्ये संशयितांनी धारदार हत्याराने, तसेच फरशीने जुबेरला गंभीर मारहाण केली. त्यात त्याच्या शरीरातून, तसेच डोक्‍यातून रक्त वाहू लागले. त्यातच जुबेर जमिनीवरती कोसळला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. काही लोकांनी जुबेरला उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पोलिस मंडईत दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली हाेती.

समर्थ मंदिराजवळील खून प्रकरणात साता-याच्या मंगळवार पेठेतील चार युवकांना अटक
 
जाबीर आंबेकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जुबेर आंबेकरी हा सेंट्रिंगचे काम करून त्याचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची लोकांशी वादावादी होत होती. संबंधितावर पोलिसात काही अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. चार दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वादावादी झाल्याची घटनाही घडली होते. त्याबाबतही पोलिसात तक्रार दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

खुनांच्या घटनांनी कऱ्हाड सुन्न 

कऱ्हाड शहरात सलग तीन खुनांच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीचा खून, बारा डबरी परिसरातील खुन्नस देण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने पोटावर वार करून खून झाल्याची घटना ताजी आहे. त्यातच मंगळवारी रात्री येथील भाजी मंडईमध्ये युवकाचा खून झाला. सलग घडलेल्या घटनामुळे शहर हादरून गेले आहे.

खूर्चीवर काेणीही असाे! आरटीओचा कारभार म्हणजे हम नहीं सुधरेंगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com