स्वच्छतेत कऱ्हाड पालिका कोठेही कमी पडणार नाही : मुख्याधिकारी डाके

स्वच्छतेत कऱ्हाड पालिका कोठेही कमी पडणार नाही : मुख्याधिकारी डाके

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिका स्वच्छ सर्वेक्षणात हॅट्ट्रिक साधेल. कोरोना असतानाही अलीकडच्या काळातील कामामुळे कऱ्हाड पालिका देशात अव्वल स्थानावर आली आहे. त्यात पालिका कर्मचारी, सेवाभावी संस्था, नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालिका व जनतेचा सुसंवाद वाढणार आहे. लोकसहभागासह नागरिकांनीही त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले. 

पालिकेतर्फे येथील सभागृहात कोरोना काळासह स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात महिनाभरात चांगली कामगिरी केलेल्या संस्था, व्यक्तींचा सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. पालिकेचे अभियंता आर. डी. भालदार, ए. आर. पवार, गीतांजली यादव, श्रीमती रेपाळ, प्रा. जालिंदर काशिद यांची उपस्थिती होती. या वेळी पालिकेतर्फे रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लब, एन्व्हायरमेंट नेचर क्‍लब, जिमखाना संस्था, गब्बर ओन्ली गब्बर ग्रुप, शिवराय ट्रेकिंग, कऱ्हाड दर्शन ग्रुप, कऱ्हाड हॉस्पिटल असोसिएशन या संस्थांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान झाला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांत अशोक डाईगडे, संतोष कांबळे, राहुल गायकवाड, महेश भिसे, स्वाती कांबळे, अर्चना लादे, माया भोसले, उत्तम बेचके यांचा सत्कार झाला. 

श्री. डाके म्हणाले, "कोराना, लॉकडाउनसारख्या मोठ्या संकटांना मात देत आता आपला प्रवास सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात प्रायोरेटीज बदलल्या होत्या. मात्र, आता पुन्हा स्वच्छतेला महत्त्व देऊन काम करावे लागणार आहे. त्यात आपण पालिकास्तरावर कोठेही कमी पडणार नाही. त्यासाठीची माझ्यासहीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता झाली आहे. त्याप्रमाणे समाजातील नागरिक, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्थाही आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे यशाची निश्‍चित खात्री आहे. मध्यंतरी काही कालवधीमध्ये काम करता आले नसले, तरी अलीकडच्या काळात झालेल्या कामामुळे तिसऱ्यांदाही कऱ्हाड पालिकेचा देशात पहिला क्रमांक निश्‍चित येणार आहे. याबाबत आम्हाला आत्मविश्वास आला आहे. त्यामुळे आम्ही त्यात कोठेही कमी पडणार नाही. या वेळी "लायन्स'तर्फे ऍड. सतीश पाटील, "रोटरी'तर्फे प्रबोध पुरोहित, सौ. पुरोहित, "शिवराय'तर्फे शरद गाडे, जिमखान्यातर्फे विवेक ढापरे आदींची भाषणे झाली. प्रा. काशिद यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. गीतांजली यादव यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com