कऱ्हाड : पालिकांत महिलांच्या जागा वाढल्‍याने नेत्‍यांची कसोटी

खुल्या प्रवर्गांत टस्सल
Karhad Municipal Corporation
Karhad Municipal Corporationesakal

कऱ्हाड : ओबीसी आरक्षणाशिवाय मुदत संपलेल्या जिल्ह्यातील आठ पालिकांची अंतिम प्रभागरचना काल जाहीर झाली. लगेचच सायंकाळी आरक्षणाच्या सोडतीचे आदेश आले आहेत. जिल्ह्यातील आठ पालिकांतील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यातील आठ पालिकांत ओबीसी आरक्षण नसल्याने ५४ जागा खुल्या झाल्या आहेत. तर शासन निर्णयाने वाढलेल्या २९ अशा दोन्ही मिळून ८३ जागांवर संधी कोणाला द्यायची, याची कसोटी स्थानिक नेत्यांसमोर आहे. आठ पालिकांत २१३ जागांसाठी १०७ महिलांच्या तर १०६ खुल्या जागा आहेत. खुल्या जागांतही महिलांना संधी मिळणार असल्याने जिल्ह्यातील पालिकांत महिलाराज असणार आहे.

जिल्ह्यातील आठ पालिकांत शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे २९ नगरसेवक यापूर्वीच वाढले आहेत, त्यातच ओबीसी आरक्षण नसल्याने ५४ जागाही खुल्या होत आहेत. दोन्ही मिळून ८३ जागांवर कोणाला संधी द्यायची, याची विवंचना प्रत्येक पालिकेतील स्थानिक नेत्यांसमोर असणार आहे. त्यामुळे चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला आहे. ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणानुसार तब्बल ५४ जागा रिक्त होतात. त्या जागांचा समेट घडवताना अधिक काळजीपूर्वक राजकीय हालचाली कराव्या लागणार आहेत. जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर व म्हसवड पालिकांची मुदत संपली आहे. साताराला १०, कऱ्हाडला दोन, वाई तीन, फलटणला दोन, पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर व म्हसवडला प्रत्येकी तीन नगरसवेक अशी शासनाच्या निर्णयानुसार नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. त्यात ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकांमुळे पालिकांसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात आठही पालिकांत बहुतांशी पालिकांत स्थानिक आघाड्यांवर राजकीय हालचाली आहेत. ओबीसींच्या खुल्या झालेल्या ५४ जागांची भर पडणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. ओबीसीच्या उमेदवाराची ताकद असलेला प्रभाग त्यांना सोडावा लागणार आहे. त्या ओबीसी उमेदवाराला खुल्या गटातून संधी देण्याची गरज आहे, तसे खुल्या जागेसाठी इच्छुक गटही नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुल्या जागेतील ओबीसी उमेदवाराला बंडाचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील आठ पालिकांच्या २१३ जागांसाठी १०७ महिलांच्या तर १०६ खुल्या जागा आहेत. खुल्या जागांतही महिलांना संधी मिळणार असल्याने वातावरण चांगलेच तापणार आहे. आठ पालिकांत अनुसूचीत जातीसाठी नऊ जागांवर महिला निवडून द्यायच्या आहेत. तर खुल्या १०६ जागांवरही महिला निवडणुका लढवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com