esakal | कऱ्हाड : पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारभार,टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने शेकडो लिटर पाणी वाया
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

कऱ्हाड : पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारभार,टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने शेकडो लिटर पाणी वाया

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारभार वरचेवर चव्हाट्यावर येतो आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या भरल्या की, त्या ओव्हर फ्लो होतात. त्यामुळे शेक़डो लीटर पाणी वाया जाते आहे. वाहणारे पाणी त्या भागातील नागरीकांच्या घरात शिरल्यानेही नुकसान होते आहे. यावर वारंवार कार्यवाहीची मागणी होत आहे. मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी त्या भागातील नागरीक पालिकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

शहरातील चोवीस तास पाणी योजनेची बोम्ब असतानाच आता ओव्हर फ्लो पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नऊ टाक्या आहेत. त्यातील बहुतांशी टाक्या नागरी वस्तीत आहेत. त्यापैकी बहुतांशी पाण्याच्या टाक्या भरल्या की, त्या ओव्हर फ्लो होतात. त्याचा त्या भागातील स्थानिकांना त्याचा त्रास होतो आहे. पालिका पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराचा फटका नागरीकांना सोसावा लागतो आहे. त्याशिवाय दररोज शेकडो लीटर पाणीही वाया जाते आहे. त्यावर कार्यवाही करताना पाणी पुरवठा विभाग कुचकामी ठरतो आहे. येथील रविवार व बुधवार पेठेतील पाण्याच्या टाक्यांना पाणी ओव्हर फ्लो होवून वाया जाण्याचा व तेथील स्थानिकांना विशेष त्रास सहन करावा लागतो आहे.

हेही वाचा: पोटच्या मुलानेच केला आईचा खून! बार्शी शहरातील घटना

पाणी टाक्या ओव्हर फ्लो होवून वाहत असल्याचा प्रश्न सहा ते सात वर्षापासून गाजतो आहे. रविवार पेठेत लाखोचे नुकसान झाले आहे. तरिही पालिका त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही त्या भागातील रहवाशा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुशंगाने इशाराही देण्यात आला आहे.

loading image
go to top