
ही दरड पडल्याने डांगरेघर-केळघर रस्ता वाहतुकीस सध्या बंद करण्यात आला असून पावसाचे प्रमाण राहिल्यास रस्ता पूर्णपणे खचून दळणवळणाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Video : जावळीतील 'हा' प्रश्न सुटण्यासाठी दहा वर्ष ग्रामस्थ झटताहेत
केळघर (जि. सातारा) : केळघर ते डांगरेघर दरम्यान वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यावर दरड कोसळल्याने डांगरेघर येथील ग्रामस्थांचा केळघर बाजारपेठेशी असणारा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. परिसरात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस पडत आहे.
सातारकरांनाे... कुटुंबाचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी हे करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह
जून ,जुलै महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने प्रमुख नदी असलेली वेण्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीच्या पाण्यातील प्रवाह वाढला आहे. नदीचे पाणी डांगरेघर-केळघर रस्त्यावरील दरीवर आदळून दरड कोसळली आहे. गेल्या दहा वर्षांपासून या दरीलगत संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी डांगरेघर ग्रामस्थ करत आहेत. मात्र याकडे लक्ष न दिले जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शनिवारी पहाटे या भागात दरड कोसळली आहे.
मिलिटरी अपशिंगे, पुस्तकांचं भिलार माहितीच असेल, मग जाणून घ्या टॅक्सीचं गाव
या क्लबचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिली 12 हजार फळझाडे दत्तक
ही दरड पडल्याने डांगरेघर-केळघर रस्ता वाहतुकीस सध्या बंद करण्यात आला असून पावसाचे प्रमाण राहिल्यास रस्ता पूर्णपणे खचून दळणवळणाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेचा पंचनामा मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी संदीप ढाकणे यांनी केला आहे.
टॅबचं वाटप करणाऱ्या मुंबई पालिकेच्या शाळेचेच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित
दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होण्याची भीती असून डांगरेघर ग्रामस्थांचा केळघरशी संपर्क तुटणार आहे. त्यामुळे येथे संरक्षण भिंत बांधण्यात यावी. अशी मागणी सखाराम बुवा सुर्वे, पोलीस पाटील बाजीराव सुर्वे यांच्यासह डांगरेघर ग्रामस्थांनी केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Web Title: Kelghar And Dangreghar Villagers Demands Reatining Wall
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..