खटाव : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम धार्मिक एकतेची वीण घट्ट
खटाव : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम धार्मिक एकतेची वीण घट्टsakal

खटाव : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम धार्मिक एकतेची वीण घट्ट

खटाव : खटाव येथील जोगेश्वरी मंडळाच्या सदस्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नारा देत याही वर्षी नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करत सलग अकरा वर्षे जातीय सलोख्याचे दर्शन घडवून आणून धार्मिक एकतेची वीण घट्ट केली आहे. दरवर्षी येथील झारी गल्लीतील हिंदू व मुस्लिम समाज श्रध्देने एकत्र येऊन मनोभावे देवीची प्रतिष्ठापना करून सलग नऊ दिवस हिंदू बांधवांच्या बरोबरीने उपवास धरून दररोज दोन वेळा देवीच्या आरतीमध्ये सहभागी होत पूजा-अर्चा देखील करत असतात.

खटाव : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम धार्मिक एकतेची वीण घट्ट
हिंदूस्थान निर्लज्ज लोकांचा देश ते दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पैसे

येथील जोगेश्वरी गणेश मंडळाच्या अध्यक्षा व तनिष्काच्या समन्वयीका रुपाली शितल झिरपे यांनी ११ वर्षापूर्वी पुढाकार घेऊन मंडळाची स्थापना केली. सकाळ शी बोलताना त्यांनी सांगितले की या परिसरातील मुस्लिम बांधव व भगिनी नवरात्रीच्या काळात केवळ उत्सव म्हणून न पाहता तन,मन व धनाने स्वतःला वाहून घेतात. हा समाज नऊ दिवस केवळ उत्सवातच सहभागी होत नाही तर त्यांच्या घरातही घट बसवले जातात व नऊ दिवस उपवास देखील केले जातात.पुरुष मंडळी देखील नऊ दिवस मांसाहार वर्ज्य करत आसतात. त्याच बरोबर मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम देखील आयोजित केले जातात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे कार्यक्रमाला मर्यादा आल्या असल्या तरी यावर्षी मंडळाच्या वतीने संपूर्ण झारी गल्लीतील मुस्लिम भगिनींचा ओटी भरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंडळाच्या हा दुर्गाउत्सव तालुक्यात आदर्शवत ठरत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते.

अमिना बशिर झारी, जोगेश्वरी मंडळाच्या सदस्या "या परिसरातील हिंदू-मुस्लिम नेहमीच एकत्रित नांदत आलो आसून एकमेकांच्या सुखःदुखातही आम्ही मनापासून सहभागी होतो. राहीला प्रश्न देवाचा. संपूर्ण विश्वाचा निर्माता हा एक आहे. त्यामुळे राम म्हटले काय व आल्ला म्हटले काय एकच आहे अशी आमची धारणा आहे. सण-उत्सव साजरे करताना आमच्यामध्ये कधीही धर्म आला नाही. आम्ही सर्व हिंदू -मुस्लिम बंधू व भगिनी सर्व उत्सव एकोप्याने साजरे करतो. संपूर्ण मानवजातीच्य कल्याणासाठी संपूर्ण विश्वातच शांतता टिकावी,कोरोनासारखी संकटे दूर व्हावीत यासाठी दोन्हींही धर्मांतील देवाजवळ दुवा मागत आहोत. दोन्ही धर्मातील एकोप्याने साजरे होणाऱ्या सण,उत्सवामुळे जाती-धर्मातील दुरावा कमी झाला आसून सुसंवाद वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com