esakal | साहेब! आम्हांला वाळीत टाकलय; शेलार कुटुंबीयांतील महिलांची तहसीलदारांकडे धाव
sakal

बोलून बातमी शोधा

साहेब! आम्हांला वाळीत टाकलय; शेलार कुटुंबीयांतील महिलांची तहसीलदारांकडे धाव

याबाबत कोणतेही राजकीय कारण व वाद नाही. मात्र, गावातील लोक परस्पर समजुतीने आम्हाला वेगळे टाकतात असल्याचे सरूबाई शेलार यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

साहेब! आम्हांला वाळीत टाकलय; शेलार कुटुंबीयांतील महिलांची तहसीलदारांकडे धाव

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : गावातील महिलांनी आम्हाला व आमच्या कुटुंबीयांस वाळीत टाकल्याची तक्रार खावली (ता. वाई) या गावातील दोन महिलांनी तहसीलदारांकडे नुकतीच केली आहे. सरूबाई नामदेव शेलार व शकुंतला राजेश शेलार अशी तक्रारदार महिलांची नावे आहेत. 

त्यांनी तहसीलदारांकडे केलेल्या लेखी व तोंडी तक्रारीत म्हटले आहे, की गावातील लग्न सोहळे, महिलांचे कार्यक्रम व शेतीच्या कामांसाठी आम्हाला बोलावले जात नाही. गावातील 90 कुटुंबांपैकी केवळ आमच्या दोन कुटुंबीयांना गावातील कार्यक्रमाचे निमंत्रण जाणीवपूर्वक दिले जात नाही. महिला दिनानिमित्त गावातील नवलाई मंदिरात दहा ते 12 महिलांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आम्हा दोघींना निमंत्रण दिले नव्हते. 

सर्व कार्यक्रमास गाव व गावातील महिला एकत्र येतात; परंतु आम्हाला एकत्र येऊ दिले जात नाही. काही कार्यक्रम, बैठकीचे निमंत्रण आमच्या कुटुंबीयांना दिले जात नाही. त्यामुळे आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. गावातील लोक आम्हाला अपमानित करत असल्याची भावना मनात उत्पन्न झाल्याची तक्रार या महिलांनी तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे केली आहे. याबाबत कोणतेही राजकीय कारण व वाद नाही. मात्र, गावातील लोक परस्पर समजुतीने आम्हाला वेगळे टाकतात असल्याचे सरूबाई शेलार यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

ग्रामस्थांनाे! 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू; सायंकाळी पाचनंतर घराबाहेर पडू नका

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास सरकारला बांगड्यांचा आहेर पाठविणार

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top