कोल्हापुरच्या निकालाने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब : शंभुराज देसाई

कोल्हापुर पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisakal

कऱ्हाड : कोल्हापुर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शांत, संयमी आणि दुरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वावर कोल्हापुरच्या निकालातुन शिक्कामोर्तब झाले आहे. मी जाधव ताईंचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रीया गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज येथे दिली.

कोल्हापुरच्या जोतीबाचे दर्शन घेवुन साताऱ्याकडे रवाना होण्यापुर्वी मंत्री देसाई काहीकाळ येथील विश्रामगृहात थांबले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, कोल्हापुर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. त्याचे श्रेय कोल्हापुरच्या जनतेला आणि महाविकास आघाडीसाठी मतदान केलेल्या मतदारांना आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शांत, संयमी आणि दुरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वावर कोल्हापुरच्या निकालातुन झाले आहे. मी जाधव ताईंचे अभिनंदन करतो.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमधील कोणतीही निवडणुक लागली किंवा कोणत्याही आमदाराने राजीनामा दिल्यास तर तेथुन भाजपचेचा उमेदवार किंवा ते स्वतः निवडुण येतील असे सांगीतले होते. बोललल्या प्रमाणे त्यांनी आता वागणे गरजेचे आहे. त्यांना बोललेल्या वक्तव्यावर कृती करण्याची वेळ आलेली आहे.

जोतिबा यात्रेसंदर्भात ते म्हणाले, कोवीडनंतर तिसऱ्या वर्षी जोतीबाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. मानाच्या सासन काठयांचे पुजन. भाविकांत मोठा उत्साह होता. पालखी सोहळा झाला. पोलिसांनी पुर्ण खबरदारी घेतली आहे. पुरेसा बंदोबस्त आहे. पोलिस अधिक्षक व अन्य अधिकारी तेथे आहेत. त्यामुळे शांततेत यात्रा पार पडेल, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com