कराड : कृष्णा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात

देवेंद्र फडणवीस, डॉ. भागवत कराड यांची उपस्थितीत
कृष्णा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात
कृष्णा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहातsakal

कराड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा १० वा दीक्षांत सोहळा आज रविवारी विद्यापीठाच्या प्रांगणात सुरू झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित असून, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थाननी आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर उपस्थित आहेत.

कृष्णा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात
मांजरी : ऊस तोडणी मजुरांचे हाल सुरूच

ग्रामीण भागातील जनतेला मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावे, या उद्देशाने जेष्ठ नेते, कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख (कै )जयवंतराव भोसले यांनी सन १९८२ साली कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर १९८३ साली कृष्णा नर्सिंग विज्ञान संस्थेची व १९८४ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. २००५ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला. (कै.) जयवंतराव भोसले यांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या डॉ. सुरेश भोसले यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कृष्णा अभिमत विद्यापाठाचा नावलौकिक पोहचविला आहे.

कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून नागरिकांना पुरविल्या जाणार्‍या या उच्च गुणवत्ताप्राप्त आरोग्य सोयीसुविधांमुळेच विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘ए+’ श्रेणीचे अव्वल मानांकन, तसेच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाशी संलग्न असणार्‍या कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राला ‘एनएबीएच’चे राष्ट्रीय मानांकन लाभले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील बालरोग विभागाच्या अतिदक्षता कक्षाला भारतीय राष्ट्रीय नवजात मंचाचे (नॅशनल निओनॅटल फोरम ऑफ इंडिया) मानांकन मिळाले आहे. रूग्णालयाच्या रक्तपेढीला ‘एनएबीएच’ या राष्ट्रीय संस्थेचे मानांकन लाभले असून, कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रोगनिदान प्रयोगशाळेलाही ‘एनएबीएल’ या राष्ट्रीय संस्थेकडून मानांकन मिळाले आहे.

गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन पद्धती, एकाच छताखाली उपलब्ध असलेली उच्च शैक्षणिक सुविधा आणि बहुवैशिष्ट्यपूर्ण आरोग्य व रोगनिदान सेवा या वैशिष्ट्यांबद्दल ख्यातकीर्द असणार्‍या कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या यंदाच्या १० व्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील मेडिसिन अधिविभाग (४७६), नर्सिंग (२९७), दंतविज्ञान (१८४), फिजिओथेरपी (१२८), अलाईड सायन्स अधिविभाग (८०) आणि फार्मसी (६२) अशा सहा अधिविभागांतून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी. फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या एकूण १२२७ विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान होत आहे. यापैकी आठ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करुन गौरविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com