esakal | कुडाळात सत्ता स्थापनेसाठी पॅनेलचे हाेणार मनाेमिलन?

बोलून बातमी शोधा

कुडाळात सत्ता स्थापनेसाठी पॅनेलचे हाेणार मनाेमिलन? }

या निवडणुकीला खऱ्या अर्थाने तिरंगी लढतीने रंगत निर्माण झाल्याचे निकालावरून अधोरेखित झाले. सध्या स्पष्ट बहुमत कोणालाच मिळवता आले नसून, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होणार आहे.

कुडाळात सत्ता स्थापनेसाठी पॅनेलचे हाेणार मनाेमिलन?
sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे गटाच्या रयत पॅनेलला सात, विरेंद्र शिंदे यांच्या सत्ताधारी समर्थ पॅनेलला चार, तर हेमंत शिंदे यांच्या बहुजन विकास आघाडीलाही चार अशा जागांवर विजय मिळाला. बहुमताचा आठ हा जादुई आकडा कोणत्याही पॅनेलला मिळवता न आल्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामपंचायतीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अशी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने मोठा राजकीय पेच उभा राहिला आहे.
 
मागील निवडणुकीत अनेक वर्षांनंतर सत्तांतर झाले व विरेंद्र शिंदे गटाने सत्ता स्थापन करत सरपंचपदी काम केले. मात्र, या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ पॅनेलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागल्याने सत्ताधाऱ्यांना जनतेने नाकारल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांचे पारंपरिक विरोधक समजल्या जाणाऱ्या उपसभापती सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनेलला सर्वाधिक सात जागांवर यश मिळाले, तर तीन जागांवर त्यांना थोडक्‍या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीच्या सुरुवातीपासून महत्त्वपूर्ण ठरलेल्या कुडाळ बहुजन विकास आघाडीने पहिल्यांदाच स्वतंत्र्य पॅनेल उभे करूनसुद्धा चार जागांवर यश मिळवत त्यांनी राजकीय आखाड्यात मुसंडी मारली. या निवडणुकीला खऱ्या अर्थाने तिरंगी लढतीने रंगत निर्माण झाल्याचे निकालावरून अधोरेखित झाले. सध्या स्पष्ट बहुमत कोणालाच मिळवता आले नसून, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होणार आहे.

पैसे थकीत ठेवणे पडले महागात; कऱ्हाडातील जमिनी हाेणार सरकार जमा
 
सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक सात जागा उपसभापती शिंदे यांच्या गटाकडेच असल्यामुळे निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, आगामी काळात राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याच्या मार्गावर असल्यामुळे नक्की सत्ता कोणाची हे येणारा काळच सांगणार आहे. सध्या सत्ताधारी किंवा विरोधी गट दोघांपैकी कोणालाही सत्ता स्थापन करावयाची असेल, तरी कुडाळ बहुजन आघाडीला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यामुळे प्राथमिक स्वरूपात तरी सत्तेच्या चाव्या या कुडाळ बहुजन आघाडीकडेच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

असे आहेत विजयी उमेदवार

धैर्यशील शिंदे (334 रयत), जगन्नाथ कचरे (366,रयत), मनीषा नवले (360 रयत), दत्तात्रय कांबळे (305 रयत), सुरेखा कुंभार (302 रयत), जयश्री शेवते (351 रयत), दिलीप वारागडे (292 रयत), अर्चना वारागडे (316 बहुजन), राहुल ननावरे (327 समर्थ), सोमनाथ कदम (310 बहुजन), सुधा रासकर (306 बहुजन), प्राजक्ता शिंदे (288 बहुजन), विरेंद्र शिंदे (380 समर्थ), गौरी शिराळकर (333 समर्थ), रूपाली कांबळे (311 समर्थ).

दहा कोंबड्यांचा मृत्यू; कुडाळकरांत चिंता, माणवासियांना दिलासा

Edited By : Siddharth Latkar